Dog Bite Cases In Goa Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs Attack: गोव्यातील किनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा वाढला उच्छाद! तीन ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला; सलग घटनांमुळे चिंतेत भर

Goa Beach Stray Dogs Attack: दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांत दोन परदेशी ज्येष्ठ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beach Stray Dogs Attacks

पणजी: दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांत दोन परदेशी ज्येष्ठ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान, किनाऱ्यावर तैनात असलेल्या दृष्टी मरीनच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्यांना प्रथमोपचार करून मदत केली. बुधवारी आणि गुरुवारी घडलेल्या या घटनांपूर्वी बाणावली समुद्रकिनाऱ्यावरही अशीच एक घटना घडली होती. कर्नाटकातील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर तीन भटक्या कुत्र्यांनी बीच शॅकमध्ये हल्ला केला होता. यात ते जखमी देखील झाले होते.

गुरुवारी युनायटेड किंगडममधील ६० वर्षीय नागरिक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पाच भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. एका कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. किनाऱ्यावर असलेल्या दृष्टी मरिन कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ मदत केली. याच समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी ७६ वर्षीय रशियन महिलेसोबतही अशीच घटना घडली होती. समुद्रकिनाऱ्यावर चालत असताना एका भटक्या कुत्र्याने अचानक धाव घेत तिच्यावर हल्ला केला होता. या महिलेवर देखील तत्काळ प्रथमोपचार करण्यात आले होते.

या घटनांमुळे दक्षिण गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर लक्ष देण्याची गरज असल्याचे लोक बोलू लागले आहेत. स्थानिक प्रशासनाला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन देखील येथील स्थानिकांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

SCROLL FOR NEXT