Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs Attack: कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाढतोय भटक्या कुत्र्यांचा धोका! मिशन रेबीजचे निरीक्षण, दुर्गाभाट येथे जनजागृती मोहीम

Goa Stray Dogs Problems: या पार्श्वभूमीवर मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांनी १९ एप्रिल रोजी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा अभ्यास केला आणि गावात जनजागृती मोहीम राबवली.

Sameer Panditrao

पणजी: फोंडा तालुक्यातील दुर्गाभाट येथे १८ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अतिशय दु:खद घटना घडली. अनाबिया शेख या १८ महिन्यांच्या चिमुकलीवर रस्त्यावर असलेल्या काही भटक्या कुत्र्यांनी हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना सर्वांना हादरवून टाकणारी ठरली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांनी १९ एप्रिल रोजी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा अभ्यास केला आणि गावात जनजागृती मोहीम राबवली. अधिकाऱ्यांनी या भागाचा आढावा घेतला असता येथे कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असल्याचे दिसून आले.

या परिसरात अनेक भटके कुत्रे आढळून आले, जे स्थानिकांना त्रासदायक ठरत आहेत. दरम्यान, उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा व ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे हे कुत्र्यांसाठी प्रजनन स्थळ बनल्याचे निरिक्षण अधिकाऱ्यांनी अहवालात नोंदवले आहे.

उपाययोजना आवश्‍यक

मिशन रेबीज यांनी तयार केलेल्या अहवालात चिमुरडी एकटीच रस्त्यावर गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे ती कुत्र्यांच्या संपर्कात आली आणि हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.

या निरीक्षणांवरून समजते या भागात त्वरित आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत आणि त्यामध्ये जनजागृतीसह प्राण्यांची जन्मनियंत्रण योजना राबवणे महत्त्वाचे आहे असेही अहवालात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT