Bardez Stray Animals Dainik Gomantak
गोवा

Bardez Stray Animals: भटक्या कुत्र्यांसोबत मोकाट गुरेही बनली डोकेदुखी, बार्देशात शेतकरी हवालदिल; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Bardez Stray Cows Problem: महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर व गावांमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना त्रासाचे प्रसंग घडत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश: बार्देश तालुक्यात मोकाट जनावरे व भटकी कुत्री यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर व गावांमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना त्रासाचे प्रसंग घडत आहेत. काही ठिकाणी मोकाट गुरांमुळे शेतांवरील पिकांचेही नुकसान होत आहे.

म्हापसा (Mapusa) शहरात तसेच आसपासच्या पंचायती क्षेत्रांमध्ये मोकाट जनावरे बेधडकपणे रस्त्यांवर वावरताना दिसतात. यामुळे दुचाकीस्वारांसाठी धोका वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी हडफडे येथे अशाच प्रकारच्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. आमदार मायकल लोबो यांनी काही महिन्यांपूर्वी बार्देशसाठी स्वतंत्र गोशाळेची मागणी केली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

वाहतूक कोंडीची समस्या

म्हापसा नगरपालिका क्षेत्रात देखील ही समस्या गंभीर आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही मोकाट गुरे रस्त्यावर आढळतात. ही जनावरे रस्त्यावरच विसावलेली दिसतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढते. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार, प्रत्येक नगरपालिका व पंचायत क्षेत्रात मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोंडवाडे उभारणे बंधनकारक आहे. शासनाने यासाठी निधीही दिला आहे, मात्र योग्य अंमलबजावणी न झाल्याने समस्या सुटलेली नाही.

ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागातही डोकेदुखी ठरत आहे. लहान मुलांवर हल्ले, चावे यामुळे आरोग्यविषयक धोके निर्माण झाले आहेत. फोंडा शहरातही अशा हल्ल्यांची नोंद झाली आहे. याशिवाय, अपघातांमध्ये गुरे व कुत्र्यांचाही जीव धोक्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

SCROLL FOR NEXT