Strange accident in three bikes in bicholim Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत तीन दुचाकींमध्ये विचित्र अपघात

तिन्ही दुचाकी स्वार पडले रस्त्यावर

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील वाठादेव येथे तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक जखमी झाला आहे. आज शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास जलस्रोत खात्याच्या इमारतीसमोर हा अपघात (Accident) घडला. अपघातातील जखमीला उपचारासाठी डिचोली सामाजिक आरोग्यकेंद्रात नेण्यात आले. अपघात नेमका कसा झाला, त्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र समोरासमोर आणि बाजूने मुख्य रस्त्यावर आलेल्या दुचाकीस्वारांमध्ये गोंधळ उडाल्याने हा अपघात घडल्याचे समजते.

तिन्ही दुचाकी स्वार रस्त्यावर पडले. अपघातस्थळी लोकांनी गर्दी केली होती. काहीवेळ मुख्य रस्त्यावरील वाहतूकही (traffic) खोळंबली. डिचोली पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, आज बोरी येथील जुन्या पुलाच्या खाली झुवारी नदीच्या पात्रात फातोर्डा-मडगाव येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज (शनिवारी) दुपारी आढळला. माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. विद्यार्थ्याचे नाव आर्यन राजेंद्र बरड (18) असे असून तो मठरस्ता घोगळ-फातोर्डा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा बारावीत शिकत होता व पुढच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा असल्याने तो तणावाखाली होता. आज सकाळी तो घरातून गायब झाल्याचे निदर्शनास येताच बरड कुटुंबीयांची धावपळ उडाली. आर्यनचा सगळीकडे शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. दुपारी त्याचा मृतदेह बोरी येथे पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फोंडा (Ponda) पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह चिकित्सेसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT