Goa CM Pramod Sawant And LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे; शिस्तीचा मुद्दा मांडताच युरी आलेमाव आक्रमक

Goa Assembly Monsoon Session 2025: सभागृहातील शिस्तीच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये चर्चा रंगली होती.

Pramod Yadav

सभागृहात सभापतींचा सर्व सदस्यांनी उचित मान राखावा तसेच त्यांना अरे - तुरे असे एकेरी उद्देशून बोलू नये आणि शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सभापतींवर पुस्तक भिरकावणे देखील योग्य नसल्याचे सावंत म्हणाले यानंतर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील डोळे मारण्याचे (सभापतींना) बंद करावे, असे मत मांडले.

शून्य प्रहाराच्या अखेरीस मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहाला संबोधित करुन एक आवाहन केले. गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत सभापतींवर पुस्तक भिरकावणे योग्य नसल्याचे सावंत म्हणाले. सभापतींच्या खूर्चीचा उचित मान सर्वांनी राखायला हवा, त्यांना अरे - तुरे असे एकेरी संबोधित करु नये, सदस्यांनी वैयक्तिक आरोप करु नयेत. सभागृहात चर्चा करत असताना सभागृहाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डोळे मारण्याचे (सभापतींना) बंद करावे असे मत मांडले. यावेळी सभापतींनी देखील कोणाला डोळे मारतात? असा प्रतिप्रश्न केला. मुख्यमंत्री कोणाला डोळे मारतात हे सर्वांना माहितीये, असे आलेमाव पुढे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी हातवारे करण्याची सवय देखील बंद करावे, असे आलेमाव म्हणाले.

सभागृहातील शिस्तीच्या मुद्यावर भाष्य करताना सभापतींनी युरींनी मागील आठवड्यात केलेली कृती अयोग्य असल्याचे मत मांडले. युरींची कृती लोकशाहीला धरुन नसल्याचे सांगताना त्यांनी हे मान्य करावे असेही सभापती म्हणाले. यावेळी मंत्री सुदीन ढवळीकरांनी देखील मत मांडत युरी आलेमाव यांचे काका आणि वडील देखील या सभागृहात होते पण त्यांनी कधीही अशाप्रकारचे कृत्य केले नसल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT