MLA Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Tender : कोकण रेल्वेच्या ‘रेंट अ बाईक’ची निविदा थांबवा : आमदार वेंझी व्हिएगस

Konkan Railway Tender : बेकारी वाढल्याने स्थानिकांना रोजगार आवश्यक

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway Tender :

मडगाव, कोकण रेल्वेने विविध रेल्वे स्थानकांवर रेंट-अ -बाईक सेवा सुरू करण्याची जी योजना आखली आहे त्यास विरोध करताना बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तातडीने सदर निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे.

ते पुढे म्हणाले, बेकारी वाढल्याने स्थानिकांना रोजगारांची गरज आहे, त्यासाठी शासनाने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. पुरेशा रोजगाराच्या संधींचा अभाव लक्षात घेता स्थानिकांच्‍या स्वयंरोजगाराच्या उपक्रमांना सरकारने पाठिंबा देण्याची गरज व्हिएगस यांनी व्यक्त केली. आता अचानक कोकण रेल्वे दुचाकी भाड्याने देण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याचा विचार करत आहे.

आम्ही या योजनेला तीव्र विरोध करतो. स्थानिक लोक स्वयंरोजगारासाठी प्रयत्नशील आहेत, कारण सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका वेंझी यांनी केली.

दक्षिण गोवा रेंट ए-बाईक असोसिएशनने निषेध व्यक्त करताना कोकण रेल्वे महामंडळाच्या बाईक आणि कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेने कारवार, काणकोण, मडगाव, करमळी आणि थिवी येथे रेंट-अ-बाईक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ऑपरेटर मिळविण्याकरिता निविदा जारी केली होती.

पत्रकार परिषदेत दक्षिण गोवा रेंट ए-बाईक असोसिएशनच्या सदस्यांनी बाणावलीचे आमदार व्हिएगस यांच्यासह केआरसीची सदर निविदा प्रक्रिया त्वरित थांबवण्याची मागणी केली.

रेल्वे धोरणाचा फटका

संघटनेचे सचिव सेबी डिमेलो म्हणाले, कोकण रेल्वेच्या सध्याच्या धोरणामुळे मोठा फटका बसेल.परिस्थिती बिकट होईल, असे मत व्यक्त केले. दुचाकी मालकांना सततच्या तोट्यामुळे दुचाकी विकाव्या लागल्या आहेत. सरकारने या व्यवसायात असलेल्या स्थानिकांना पाठिंबा द्यायला हवा होता. तथापि, कोकण रेल्वे आता या व्यवसायात उतरू पाहत असल्याने आम्हांला नुकसानीची भीती आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

कोरोना व्हायरस करु शकतो कॅन्सरग्रस्त रुग्णांचा इलाज? नव्या अभ्यासाने डॉक्टरही चकित; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT