(संग्रहित फोटो)
(संग्रहित फोटो) Dainik Gomantak
गोवा

गोव्यात परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी रोखा

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्यातील समुद्रात परप्रांतीय मच्छीमार बेकायदेशीर घुसखोरी करून मासेमारी करत असल्यामुळे गोमंतकीय मच्छीमारांना याचा फटका बसत आहे, असा आरोप गोमंतकीय गोवा प्रदेश काँग्रेसचे युवा नेते ओलांसीयो सीमोईस यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मच्छीमाऱ्यांच्या भल्यासाठी सरकार तसेच मत्स्योद्योग विभागाने या घुसखोरीवर रोख लावण्यासाठी त्वरित पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून समुद्रात घुसखोरी करून मासेमारी करण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत चालली असून याचा थेट फटका गोमंतकीय मच्छीमारांना बसत आहे.

काही दिवसांपूर्वी बाणावली समुद्रात परप्रांतीय मच्छीमारांनी अवैधरीत्या घुसखोरी केली असता स्थानिक मासेमाऱ्याच्या सतर्कतेमुळे परप्रांतीय मासेमाऱ्यावर कारवाई करण्यात आली. स्थानिक मासेमारी या घुसखोरांना पकडण्याचे काम करतात तर मत्स्यव्यवसाय विभाग काय करत आहेत, असा सवाल ओलांसीयो सीमोईस यांनी उपस्थित केला. मत्स्योद्योग विभाग स्थानिक की घुसखोर मालपे बॉट मालकांच्या बाजूने आहे, याची चौकशी होणेही गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी होणार: CM सावंत

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

Goa 2075 देशातील पहिली लाईव्ह कादंबरी; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पाच व्यक्तींची कथा

FDA Raid At Mapusa: म्हापसामध्ये अन्न आणि औषध प्रशानसनाची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT