St. Inez Road Closer Dainik Gomantak
गोवा

St. Inez Road Closer: सांतिनेजमधील रस्ता एक महिना वाहतुकीसाठी राहणार बंद

St. Inez Road Closer: रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे केलेले काम क्युरींग वेळेसह रस्त्याच्या इतर भागांचे होणारे काम पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित कालावधी 30 दिवसांचा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

St. Inez Road Closer

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत चालू असलेल्या रस्ते सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणून सांतिनेजमधील झाकिस बिर्याणीजवळील स्टर्लिंग अपार्टमेंट (शीतल हॉटेलसमोरील) ते सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालयापर्यंत (पाणी विभाग) सुमारे दीडशे मीटर अंतरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे केलेले काम क्युरींग वेळेसह रस्त्याच्या इतर भागांचे होणारे काम पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित कालावधी 30 दिवसांचा आहे.

तथापि, या भागातील प्रवाशांना आणि रहिवाशांना कमीत कमी व्यत्यय येण्यासाठी पर्यायी प्रवेश प्रदान केले जातील. या कालावधीत रहिवासी आणि प्रवाशांकडून सहकार्य करण्याची विनंती 'आयपीएससीडीएल' 'ने केली आहे.

वेलनेस मेडिकल ते मधुबन सोसायटीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे आणि लहान ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे. जे काँक्रिटीकरण झाले आहे, त्याच्या क्युरिंगसाठी वेळ लागणार आहे. आणखी दोन आठवडे तरी या रस्त्याचे काम चालण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपला हरवायचा प्लॅन काय?' काँग्रेसने स्पष्ट करावे; 'आप'चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांचा थेट सवाल

Goa Business Regulations: उद्योगांसाठी नियम सुलभ करणाऱ्या कायद्याला राज्यपालांची मंजुरी; परवानग्या, अनुपालन प्रक्रिया होणार सोपी

UPI Charges: ना टॅक्स, ना सेस... युपीआय पेमेंट्सबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; ग्राहकांच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही VIDEO

SIM Card Security Advisory: सिम कार्ड दुसऱ्याला देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा! होऊ शकतो 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांचा दंड; सरकारकडून हाय-अलर्ट ॲडव्हायजरी जारी

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात स्टार क्रिकेटपटूंची चौकशी, बोर्डानं मीडियासमोर बोलण्यास घातली बंंदी

SCROLL FOR NEXT