Best Camping Places in Goa Dainik Gomantak
गोवा

Camping in Goa: कॅम्पिंगसाठी गोव्यातील या 4 'टेंट'ला द्या भेट

गोव्याचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो.

दैनिक गोमन्तक

* ELSEWHERE OTTER CREEK TENTS, Morji

हा टेंट एका छोट्या हॉटेलप्रमाणे आहे. येथे तुम्हाला पूर्ण सेवा आणि उत्तम जेवणाचा स्वाद घेता येईल. या सुंदर लक्झरी टेंटमध्ये एन-सूट बाथरूम, रेफ्रिजरेटेड मिनी बार आणि पंखा यासारख्या अनेक सोई मिळेल. तुम्हाला या ठिकाणी निसर्गाचा खरोखर आनंद घेण्याची संधी मिळेल. थंड वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांची किलबिलाट याचा आनंद तुम्हाला घेता येईल. तसेच येथे तुम्हाला लॉन्ड्री सेवा, हाऊसकीपिंग, कार आणि ड्रायव्हरची सोय देखील दिल्या जाते. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात तुम्ही येथे भेट देवू शकता. येथील भाडे 2,000 रुपयापासून सुरूवात होते.

Elsewhere Otter Creek Tents, Morjim

* COLA BEACH TENTED RESORT, CANACONA

हे टेंट आंगोद समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर आहे. यामुळे तुमची बीचचा देखील आनंद घेऊ शकता. स्थानिक गोंवण पदार्थासह व्हेज, नॉनव्हेज आणि फ्रेश सी फूड तसेच अल्कोहोल आणि वाईन येथे मिळेल. संध्याकाळी तुम्ही टॅक्सीने गोव्याचा (Goa) फेरफटका देखील मारू शकता. धावपळीच्या जीवणात जर तुम्हाला शांतता आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला येथे नाश्ता, लॉन्ड्री सेवा, हाऊसकीपिंग, मच्छरदाणी, पंखा, मोफत वाय-फाय, यासारख्या सोयी मिळेले. येथील भाडे 4,500 रुपयापासून सुरूवात होते.

COLA BEACH TENTED RESORT, CANACONA

FIVE FIVE RESTAURANT AND TENTS, Anjuna

अंजुना (Anjuna) बीचच्या एका शांत कोपऱ्यावर 'फाइव्ह फाइव्ह रेस्टॉरंट आणि टेंट' आहे. येथील दर हे हंगामानुसार बदलत असतात. येथे येणारा प्रत्येकजण गोव्याच्या प्रेमात पडतो. मावळता सूर्य, समुद्राच्या लाटा आणि आलिशान तंबूच्या खिडक्यांमधून येणारी वाऱ्याची झुळूक कोणाला हवीशी वाटणार नाही....! येथील भाडे 2,000 रुपयापासून सुरूवात होते.

FIVE FIVE RESTAURANT AND TENTS, Anjuna

* LA MANGROVE TEPEES, GALGIBAGA

हे ठिकाण इको-लक्झरी बुटीक रिसॉर्ट आहे, जे दक्षिण गोव्यात वसलेले आहे. येथे तुम्ही गोव्यातील समृद्ध विविधता अनुभवू शकता.या टेंटमध्ये जाताना खाली वाकून जावे लागते हे लक्षात घ्यावे. येथे तुम्ही फिशिंग, गोंवण पदार्थ, योगा, मसाज, बीच चा आनंद घेऊ शकता. येथील भाडे 12,500 रुपयापासून सुरूवात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milk Analogue Products: अस्सल दुधाच्या नावावर स्वस्त 'ॲनालॉग' ची विक्री; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना मेन्यू आणि बोर्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक

Horoscope 23 Saptember 2026: पैशांच्या बाबतीत बुधवार महत्त्वाचा दिवस! संपत्ती आणि समृद्धीचे नवे मार्ग मोकळे; 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये होणार भरघोस वाढ

Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

SCROLL FOR NEXT