Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

...परंतु पार्सेकर,पर्रीकर यांच्या निर्णयाचा पक्षावर काही फरक पडणार नाही

मांद्रे मतदार संघातील जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजप पक्ष चांगलाच चर्चेत आला आहे. उत्पल पर्रीकरांना डावलून पणजी येथून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. (Statement of Sadanand Sheth Tanwade on goa election 2022 about Utpal parrikar and Parsekar)

दरम्यान गोवा निवडणूक आयोगाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांना दोन पर्याय दिले होते तथापि तो पर्याय नाकारून उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तसेच मांद्रे मतदार संघातून पार्सेकर यांना देखील भाजप कडून डावलण्यात आले आहे. पार्सेकर आपल्या निर्णयावर ठाम राहत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

"मांद्रे मतदार संघातील जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे; या बाबत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतलेला हा निर्णय दुर्दैवीच आहे असे विधान सदानंद शेठ तानवडे यांनी केले; ते पुढे म्हणाले. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकरांनी घेतलेल्या निर्णयाचे दु:खच आहे, परंतु त्याचा पक्षावर काही फरक पडणार नाही.

अपक्ष पद्धतीने निवडणूक लढण्याचे जाहीर

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, ''मी पणजीणमधून अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मला अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिली आहे. मी त्यांचं धन्यवाद मानतो. पणजीमधील तमाम मतदारांसाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच त्यांनी पुढे म्हटले, ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केले त्यांच्यासाठी मी आगामी विधानसभा निवडणूक लढवत आहे. माझ्यावर अन्याय झाला म्हणून काय झालं मला त्याचं काहीचं वाटत नाही. जेव्हा माझे वडिल गोव्याच्या सक्रीय राजकारणात होते तेव्हा त्यांनी गोव्यातील जनतेसाठी कार्य केले.''

यादरम्यान त्यांना अनेक पक्षांकडून पाठिंबा देण्याचे प्रस्ताव मिळाले होते. पण या सर्व ऑफर्सना झुगारून त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पणजीतून अपक्ष पद्धतीने निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे.

म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला पक्षाला निरोप

गोव्यात भारतीय जनता पक्षातर्फे नुकतीच पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 40 मतदारसंघांपैकी 34 जागांसाठीचे उमेदवार पक्षाने ठरवले आहेत. पक्षातील अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते. पण पक्षश्रेष्ठींना जे या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) महत्वाचे उमेदवार वाटले त्याच उमेदवारांना तिकीट देण्यात येत आहे. या निर्णयावरून नाराज होऊन माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी पक्षाला निरोप दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT