Laxmikant Parsekar  Dainik Gomantak
गोवा

हरलो तर मी राजकीय संन्‍यास घेतो: लक्ष्‍मीकांत पार्सेकर

दैनिक गोमन्तक

हरमल: गोवा विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून लक्ष्‍मीकांत पार्सेकर निवडून येणार नाहीत अशी भाकिते गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली व दिल्लीच्या नेत्यांना ऐकवली. म्हणे केडर दुखावला. असो, येत्या 10 मार्चला निकाला दिवशी त्यांनी आपली जरूर भेट घ्यावी अशी उपहासात्मक परंतु आत्मविश्वासपूर्वक टिप्पणी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पालयेत प्रचारावेळी केली. येत्‍या निवडणुकीत आपण जिंकून आलो तर या लोकांनी राजकीय संन्‍यास घेणार असल्‍याचे जाहीर करावे, अन्‍यथा विषय बंद करावा. दुसरीकडे त्‍यांनी तसे जाहीर केले तर मीसुद्धा सांगतो की, पराभव झाला तर मी राजकीय संन्‍यास घेईन, असे आव्‍हानच पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी दिले आहे. (Statement of Laxmikant Parsekar regarding Assembly elections)

गोवा (Goa BJP) प्रदेश भाजप केडर दुखावला, अशी वक्तव्ये केल्याच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार पार्सेकर यांना बोलते केले. केडर दुखावणे स्वाभाविक असून फक्त मांद्रेपुरते सीमित नाही तर पूर्ण गोव्यात. ज्या पद्धतीने आपली अवहेलना करण्‍यात आली ते आपण कधीच विसरणार नाही. मांद्रेतून मी निवडून येणार नाही अशी भाकिते ते करत आहेत. या मंडळींनी 10 मार्चला बोलते व्हावे. वास्तविक आपण पक्षाचा राजीनामा दिला व अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे.

ही मंडळी अपप्रचार व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. त्या नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. त्यांचा आपण तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांनी ही विधाने बंद करावीत व विषय संपवावा. मात्र जर या निवडणुकीत (Assembly Election 2022) आपण जिंकून आलो तर अशी वक्तव्ये व भाकिते केलेल्या मंडळींनी राजकीय संन्यास घेण्याची तयारी दाखवावी.

एवढेच नव्हे तर ज्या लोकांनी आपल्‍याविरोधात ‘कहाण्‍या’ गोव्यात व दिल्लीतील नेत्यांच्या गळी उतरविल्‍या त्या नेत्यांनीही संन्यासाची तयारी असल्याचे जाहीर करावे, असे खुले आव्हान पार्सेकर यांनी दिले. दुसरीकडे आपला पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ असेही ते म्‍हणाले. त्‍यामुळे या मतदारसंघात रंगत वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT