Goa Forward Party President Vijay Sardesai Dainik Gomantk
गोवा

जनतेला 'महागाई' कमी झालेली पाहायची असेल तर भाजपला घरी पाठवा..

गोवा फॉरवर्ड (Goa Forrward) पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांचे प्रतिपादन

दैनिक गोमन्तक

Goa Politics : सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा विधानसभेत (Assembly) स्थानिक प्रश्न मांडण्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी केलेल्या पक्षांतराच्या प्रवृत्तीपासून या मतदारसंघाला (Constituency) मुक्त करण्याची गरज आहे. जनतेला महागाई कमी झालेली पाहायची असेल तर भाजपला घरी पाठवणे अत्यंत आवश्यक आहे आणि हाच लोकांसमोर पर्याय आहे असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड (Goa Forrward) पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केले.

सांत आंद्रेचे नेते जगदीश भोबे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांत आंद्रेसाठी जाहीरनाम्याचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, संघटनमंत्री दुर्गादास कामत, दिलीप प्रभुदेसाई, पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत आदी उपस्थित होते.

जगदीश भोबे म्हणाले, की भाजपने राजकीय फायद्यासाठी म्हादईशी तडजोड केली आहे. त्यांना आग्वादचा किल्ला देखील विकायचा आहे. आता ते सरकारी नोकऱ्या विकून, पात्र उमेदवारांना वंचित ठेवत आहे. निवडणुकीत खर्च करण्यासाठी भाजप पैसे जमा करत आहे असा आरोप भोबे यांनी केला. यावेळी विकास भगत, मोहनदास लोलयेकर यांच्यासह अन्य नेत्यांचीही भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT