Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सावित्री कवळेकरांचा मुख्यमंत्र्यांकडून पत्ता कट

उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी आणि भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सावित्री कवळेकर या दौऱ्यात कुठे दिसल्या नाहीत.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या सांगे दौऱ्यात माजी आमदार सुभाष फळदेसाई यांना मिळालेले महत्त्व पाहता सावित्री कवळेकर यांचा उमेदवारीसाठीचा पत्ता मुख्यमंत्र्यांकडूनच कापल्यातच जमा आहे. फळदेसाई यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत मुख्यमंत्र्यांनी पुढील निवडणूक सांगेतील कार्यकर्त्यांनी फळदेसाई व माजी आमदार वासुदेव मेंग गावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी, असे स्पष्टपणे सांगत फळदेसाई हेच भाजपचे सांगेतील पुढील उमेदवार असल्याचे अधोरेखित केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एकाच कुटुंबात दोन कर्तबगार व्यक्तींना उमेदवारी देणे म्हणजे घराणेशाही नाही, असे पणजीत स्पष्ट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांना सांगेतून उमेदवारी मिळेल हा विश्वास दुणावला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर त्यांचे काय होणार, हा प्रश्न मात्र निर्माण झाल्यावाचून राहिलेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने युरी आलेमाव यांनी सांगेतून निवडणूक लढवली होती तेव्हा गावकर हे आमदार असूनही त्यांना उमेदवारी भाजपने नाकारली होती व फळदेसाई यांना उमेदवारी दिली होती व ते जिंकलेही होते. पुढे फळदेसाई यांना अपक्ष प्रसाद गावकर यांनी चीतपट केले. त्यासाठी भाजपमधील अंतर्गत नाराजी भोवल्याची चर्चा होती. त्यामुळे ती नाराजी आता ते दूर करू शकतील का, यावर सगळे राजकीय गणित सध्यातरी अवलंबून असल्याचे दिसते.

पहिल्यांदाच मुक्काम

सांगे, सावर्डे, कुडचडे, धारबांदोडा या ग्रामीण भागाला दोन दिवस देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवले. 2012 मधील विधानसभा निवडणुकीआधी पर्रीकर यांनी संपर्क यात्रेदरम्यान नेत्रावळीत एक रात्र मुक्काम केला होता. प्रमोद सावंत यांनीही तोच फॉर्म्यूला वापरला.

सावित्री कवळेकर कुठे?

उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी आणि भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सावित्री कवळेकर या दौऱ्यात कुठे दिसल्या नाहीत. त्यांची ही उणीव मुख्यमंत्री भेट देणार असलेल्या प्रत्येक ठिकाणी मोठाले स्वागत फलकाने भरून काढली होती.

बंद दाराआड हितगूज; वाढदिनी साधली संधी

मुख्यमंत्री काल दिवसभर विविध कार्यक्रमांत व्यस्त राहिले. जाहीर कार्यक्रमांना उपस्थिती लावतानाच त्यांनी कार्यकर्त्यांशीही बंद दाराआड हितगूज करण्यासाठीही वेळ दिला. रात्री सुभाष फळदेसाई यांच्या वाढदिवस समारंभात सहभागी होताना त्यांनी आगामी निवडणूक सांग्यातील कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुभाष फळदेसाई व वासुदेव मेंग गावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी अशी सूचना करून फळदेसाई यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

आस्थेने संवाद, सर्वांसाठी दिलासादायक वातावरण

मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात खाणी सुरू करणार, साडेतीन वर्षाच्या कालावधीतील दोन वर्षे कोविड महामारीने हिरावली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यावर विशेष लक्ष आहे, पुढील सहा महिने कार्यकर्त्याने पक्ष संघटनेसाठी द्यावे हे नेहमीचेच मुद्दे मांडले असले तरी गेल्या ठिकाणी उपस्थितांशी आस्थेने संवाद साधत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी दिलासादायक वातावरण तयार करण्याचा प्रयत्‍न केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT