Rape Case in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात महिला सुरक्षित आहेत का? मुख्यमंत्र्यांनी दिली चिंता वाढवणारी आकडेवारी

Goa Crime Report: २०२३ मध्ये बलात्काराच्या ९७ व विनयभंगच्या १०७ प्रकरणे तसेच महिलांच्या छेडछाडीची २५ तसेच महिलांशी संबंधित ५९ प्रकरणे नोंद झाली होती.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात गेल्या दोन वर्षात (२०२३ व २०२४) बलात्कार व विनयभंगाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. या काळात बलात्काराच्या २१५, तर विनयभंगच्या २४० प्रकरणे नोंद झाली आहेत. या प्रकरणांचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी २३५ प्रकरणे ही जलदगती न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत, अशी माहिती आमदार कार्लोस फेरेरा यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नावर लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी गृह खात्यातर्फे दिले आहे.

२०२३ मध्ये बलात्काराच्या ९७ व विनयभंगच्या १०७ प्रकरणे तसेच महिलांच्या छेडछाडीची २५ तसेच महिलांशी संबंधित ५९ प्रकरणे नोंद झाली होती. २०२४ मध्ये बलात्काराच्या संख्येत वाढ होऊन ती १०८ झाली तर विनयभंगाच्या प्रकरणांची नोंद १३३ वर पोहचली होती. महिलांच्या छेडछाडप्रकरणाची ३८ तसेच इतर ८६ प्रकरणांचा समावेश आहे.

या खटल्यांसाठी दोन सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणांच्या तपासावेळी उपअधीक्षकांकडून त्याची नोंद घेतली जाते. तसेच तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. गुन्ह्यामधील संशयिताल शिक्षा व्हावी, यासाठी ठोस पुरावे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. फरारी संशयितांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

पुराव्याअभावी तपास बंद!

महिलांवरील अत्याचारप्रकरणांपैकी ५० टक्क्याहून अधिक प्रकरणांचा तपास अजून सुरू आहे, तर त्यातील ४० टक्के प्रकरणांवरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या निवाड्यात संशयितांना दोषी ठरवले आहे. विनयभंगाच्या प्रकरणात ठोस पुरावे नसल्यामुळे काही प्रकरणे तपासाअंती पुराव्याअभावी बंद करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT