Tara Kerkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Red Light Area: लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात‘रेड लाईट एरिया’ हवा! तारा केरकर

राज्यातील लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी गोव्याला ‘ वेश्‍या बाजार’ (रेड लाईट एरिया) आवश्यक असल्याचे खळबळजनक मत सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी मांडले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Red Light Area: राज्यातील लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी गोव्याला ‘ वेश्‍या बाजार’ (रेड लाईट एरिया) आवश्यक असल्याचे खळबळजनक मत सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी मांडले आहे. राज्यातील सध्या वाढत्या स्त्रीविरोधी लैंगिक गुन्ह्यांवर दक्षिण गोव्यातील एका शाळेत कथित विनयभंगाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना केरकर यांनी दावा केला

की, राज्यासाठी रेड लाइट एरिया आवश्यक आहे.‘ज्यांना स्वतःला संतुष्ट करायचे आहे, ते आमच्या मुलींवर हल्ला करण्यापेक्षा तिथे जाऊन स्वतःचे समाधान करू शकतात,’ असे त्या म्हणाल्या.

केरकर म्हणाले की, बायना रेड लाईट एरिया पाडताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना इशारा दिला होता की, असे पाऊल गोव्यात तणाव निर्माण करेल.

‘वेश्‍यावस्ती’ ची मागणी दुर्दैवी : ‘अर्ज’

मडगावः पुरुषांची लैंगिक भूक भागविण्यासाठी वेश्‍यावस्ती सुरू करण्याची मागणी दुर्दैवी असून अशी मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यां महिलांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या आहेत का, असा सवाल बायणा वेश्या वस्तीतील वेश्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या ‘अर्ज’ संघटनेचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी केला आहे. राज्यातील लैगिंक अत्याचार आणि वेश्‍या व्यवसाय यांचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही. बायणा वेश्यावस्ती पाडल्यानंतर वास्कोत बलात्कार वाढल्याचे दिसून आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

SCROLL FOR NEXT