Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

राज्यातील आमदार, खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा : गावडे

त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी भाजपच्या कार्यालयात भाजप एसटी मोर्चाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

पणजी : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांनी पाठिंबा देवून मतदान करावे, असा आवाहन क्रीडा, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले आहे.

त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी भाजपच्या कार्यालयात भाजप एसटी मोर्चाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर उपस्थित होते.

गावडे पुढे म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे अत्यंत गरीब कुटुंबातून खालच्या तळागाळातील लोकांमधून वरपर्यंत पोहोचलेल्या उमेदवार आहेत.

त्यांनी संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या सेवेसाठी वाहिलेला असून त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्यासमोर आलेल्या संकटांवर केलेली मात ही सर्वांसाठी आदर्श अशी आहे. त्यामुळे भाजप एसटी मोर्चाच्यावतीने राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्या प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

सामान्य जनतेला राष्ट्रपतीपदासाठी मतदान करण्याचा अधिकार नसला तरी त्यांच्या लोकप्रतिनिधींनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करावे यासाठी सामान्य लोकांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींवर नैतिक दबाव आणून त्यांना पाठिंबा देण्याची विनंती करावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये त्या नक्कीच विजयी होतील.

त्यांचा विजय, शपथविधी सोहळा ही नागरिकांनी मोठ्या धुमधडाक्यात, उत्साहात साजरा करावा असा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच एसटी मोर्चाच्या वतीने भाजपचे आजी-माजी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच यांना एकत्रित गोळा करून मुर्मू यांच्या प्रचारापासून शपथविधीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT