Amit Shah In Goa Dainik Gomantak
गोवा

Amit Shah: अमित शहांच्या हस्ते 2451 कोटींच्या विकासकामांची होणार सुरुवात! मुखर्जी स्टेडियमवर 10 हजार लोक जमणार; वाहतूक मार्गात मोठे बदल

Amit Shah Goa visit: आनंदोत्सवात राज्यभरातील जनतेला सहभागी होता यावे, यासाठी प्रत्येक पंचायत क्षेत्रातून दुपारी २ वाजता बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्याच्या आनंद निर्देशांकात मोठी वाढ करणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी उद्या (ता. ४) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यावेळी अमित शहा यांच्या हस्ते २,४५१ कोटी रुपयांच्या विकासकामांची सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सांताक्रुझ येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर प्रत्येक पंचायत क्षेत्रातून येणाऱ्या १० हजारांहून अधिक लोकांच्या उपस्थितीत अनियमित, बेकायदा घरे नियमित/कायदेशीर करण्याचा पहिला टप्पा असलेल्या जमीन मालकी देणाऱ्या ‘माझे घर’ योजनांची सुरुवात केली जाणार आहे.

गेली काही वर्षे राज्यातील अनियमित, बेकायदा घरांचा प्रश्न या ना त्या रूपाने सरकारसमोर येत होता. त्यातच काहीजण न्यायालयात दाद मागत ही घरे पाडण्याचे आदेश मिळवत होते.

त्यातून सर्वांना मुक्ती देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अतिशय कल्पकतेने ‘माझे घर’ या संकल्पनेखाली कायदा दुरुस्त्या करवून घेतल्या. त्यानुसार उद्या अर्जांचे वितरण कार्यक्रमस्थळी करण्यात येणार आहे.

यात स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर घर बांधताना नियम न पाळलेल्या, सरकारी मालकीच्या जमिनीवर घर बांधलेल्या, कोमुनिदाद जमिनीवर घर बांधलेल्या, २० कलमी कार्यक्रमात दुसऱ्याला मिळालेला भूखंड विकत घेऊन घर बांधलेल्या, पुनर्वसन योजनेत तात्पुरती राहण्यासाठी सदनिका मिळालेल्यांना दिलासा देण्यात येणार आहे.

या आनंदोत्सवात राज्यभरातील जनतेला सहभागी होता यावे, यासाठी प्रत्येक पंचायत क्षेत्रातून दुपारी २ वाजता बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी होणारी गर्दी लक्षात घेता त्या स्टेडियमच्या विविध बाह्य भागात डिजिटल पडद्यावर कार्यक्रम पाहण्याची-ऐकण्याची सोय केली आहे.

शहांसमोर दोघांचीच भाषणे

दिल्लीहून ‘बीएसएफ’च्या खास विमानाने सायंकाळी सव्वापाच वाजता दाबोळी विमानतळावर पोचणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर त्यांच्यासमोर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाषणे होणार आहेत. शहा यांचे भाषण कार्यक्रमात सर्वांत शेवटी होणार आहे.

बैठकीची व्यवस्था अशी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री, आमदार, पक्ष पदाधिकाऱ्यांना वेगळे संबोधित करण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यासाठी ५० जणांच्या बैठकीची स्वतंत्र व्यवस्था कार्यक्रमस्थळी मंचाच्या मागील बाजूस करण्यात आली आहे.

आभासी पद्धतीने प्रकल्पांचे उद्‍घाटन

१ साडेसात वाजता कार्यक्रम स्थळाहून निघण्याआधी शहा यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना सनदा, प्रमाणपत्रे, नियुक्तीपत्रे, तसेच मंजुरी पत्रांचे वाटप होणार आहे.

२यावेळी शहा यांच्या हस्ते सरकारी प्रकल्पांची पायाभरणी तर काही प्रकल्पांचे आभासी पद्धतीने उद्‍घाटन होईल.

३यात गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे निवड झालेल्या २३० पैकी ५ जणांना नियुक्तीपत्रे, सरकारी मालकीच्या जमिनीवर घर बांधलेल्या जमीन मालकी देणाऱ्या पत्रांचे दोघांना वाटप आदींचा समावेश आहे.

४कोमुनिदाद जमिनीवर घरे बांधलेल्यांना अर्जही यावेळी त्यांच्या हस्ते वितरीत केले जातील.

वाहतुकीत बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवारच्या दौऱ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, सांताक्रुझ येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष सूचना जारी केली आहे.

अमित शहा दाबोळी विमानतळावर येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी दाबोळी विमानतळ-चिखली-राष्ट्रीय महामार्ग ३६६-नवीन जुआरी पूल-राष्ट्रीय महामार्ग ६६-जीएमसी-गोवा विद्यापीठ रस्ता-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हा संपूर्ण मार्ग सर्वसामान्य वाहनांसाठी बंद राहील. त्यामुळे या वेळेत येणाऱ्या प्रवाशांनी या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील वाहने विविध ठिकाणी सर्व्हिस रोडमार्गे वळविण्यात येणार आहेत. दक्षिण गोव्यातून येणारी वाहने जीएमसी-गोवा विद्यापीठ रस्त्याने प्रवेश करणार आहेत, तर उत्तर गोव्यातून येणारी वाहने जीएमसी अंडरपास-गोवा विद्यापीठ रस्त्याने प्रवेश करणार आहेत. इतर वाहने पणजी शहर किंवा जीएमसी अंडरपास मार्गे पुढे जाऊ शकतील.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमलगतच्या मोकळ्या मैदानावर सामान्य लोकांसाठी दोन/चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. गोवा विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर आणि आयटी हॅबिटॅट येथे केवळ बससाठी पार्किंगची सोय केली आहे. पाण्याच्या टाकीशेजारील जागा व्हीआयपी आणि अधिकारी वर्गासाठी राखीव ठेवली आहे. वाहनधारकांनी कार्यक्रम मार्गावरील रस्त्यांवर वाहने उभी करू नयेत, अशी विनंती वाहतूक पोलिसांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

Margao: शांततेसाठी घेतले घर! तळमजल्‍यावरील रेस्‍टॉरंटमुळे वृद्ध व्यक्ती तणावाखाली; 'मानवाधिकार'ने दिला दिलासा; वाचा संपूर्ण प्रकरण..

Goa: ‘उत्कृष्ट शिक्षक’ प्राध्यापकास पूर्ण सेवावाढ, सर्व लाभ द्या! गोवा विद्यापीठाला न्यायालयाकडून मुदतवाढीचे निर्देश

Goa News Live: सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Mayem: 250 वर्षांपासूनची परंपरा, पोर्तुगीज काळापासून होतेय मयेतील ‘मेस्तां’च्या शाळेत सरस्वती पूजन

SCROLL FOR NEXT