Indian Rupees Canva
गोवा

Diwali Salary Disbursement: दिवाळी येणार...! राज्य सरकार वेतन, निवृत्तीवेतन देणार 'या' दिवशी; कर्मचाऱयांना दिलासा

State government to release Diwali salary, pension : राज्य सरकार दिवाळीनिमित्त वेतन आणि निवृत्तीवेतन २५ ऑक्टोबर रोजी अदा करणार आहे. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. यासाठी सरकारला निधीची अजिबात चणचण भासणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकार दिवाळीनिमित्त वेतन आणि निवृत्तीवेतन २५ ऑक्टोबर रोजी अदा करणार आहे. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. यासाठी सरकारला निधीची अजिबात चणचण भासणार नाही.

केंद्र सरकारने वस्तू व सेवा करातील राज्याच्या वाट्यापोटी ६८८ कोटी रुपये राज्य सरकारला दिले आहेत. या निधीतून पायाभूत सुविधा विकासाला चालना देणे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या महसुलापैकी ६८ टक्के रक्कम वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनावर खर्च होते. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी सरकारला यासाठी तजवीज करावी लागते. वेतनास दोन-तीन दिवस उशीर झाला तर ती सरकारसाठी नामुष्कीची बाब ठरते.

कल्याणकारी योजनांचे लाभ दर महिन्याला मिळणे अपेक्षित असतानाही ते तिमाही पद्धतीने दिले जात असल्याच्याही तक्रारी अधूनमधून ऐकण्यास मिळतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर दिवाळीसाठीचा बोनसही सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याचा सरकारचा मार्ग वस्तू व सेवा करातील वाटा मिळाल्‍याने मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT