Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: सर्वोच्च, उच्च न्‍यायालयात अनेक खटले सुरू; ६६ लाख रुपये खर्च

Goa Government Lawyers Fees: काही वकिलांकडून अद्याप बिले सादर न केल्याने ती रक्कम सरकारकडून देय बाकी आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मागील पाच वर्षांत (जुलै २०१९ पासून) राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातील वकिलांवर १५ लाख १६ हजार ४२० रुपये तर उच्च न्यायालयातील सरकारी व खासगी वकिलांवर ५१ लाख ७१ हजार ५०० रुपये असा एकूण ६६ लाख ८७ हजार ९२० रुपये खर्च केला आहे. त्यात काही वकिलांकडून अद्याप बिले सादर न केल्याने ती रक्कम सरकारकडून देय बाकी आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी वरील उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकरणांवर सरकारचे खटले सुरू आहेत. त्यामुळे तेथे सरकारची बाजू मांडण्यासाठी वकील उभे करावे लागतात. तर, उच्च न्यायालयात सरकारी वकिलांबरोबर काही खटल्यांमध्ये खासगी वकिलांचीही सरकारला मदत घ्यावी लागत आहे. या वकिलांचे शुल्क सरकारला अदा करावे लागते. काही खटले निकालीही निघाले असल्याचे उत्तरात म्‍हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील २४ प्रकरणांवर वकिलांना १५ लाख १६ हजार ४२० रुपये शुल्क अदा करण्‍यात आले आहे. तर, राज्यात उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांसाठी अडीच लाख रुपये देण्‍यात आले आहेत. त्यातील १२ खटल्यांना हजेरी लावल्याची बिले वकिलांकडून सादर झालेली नाहीत. त्यामुळे ती देय रक्कम बाकी आहे.

३२ खटल्‍यांची बिले येणे बाकी; सिक्वेरा

१२७ खटल्यांमध्ये खासगी वकील बाजू मांडत आहेत. त्यातील ३२ खटल्यांना उपस्थित राहिल्याची बिले त्‍यांच्‍याकडून अद्याप सादर झालेली नाहीत. त्यामुळे ती देय बाकी आहे. मागील पाच वर्षांत वकिलांसाठी ९५ प्रकरणांमध्‍ये ४९ लाख २१ हजार ५०० रुपये सरकारने शुल्क अदा केले आहे, असेही कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी लेखी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT