HC Decision on Dhargal Sunburn 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa: धारगळमधल्या सनबर्नला अद्याप सरकारची परवानगी नाही!!

Dhargal Sunburn 2024: सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलला अजूनही राज्य सरकारने तसेच धारगळ पंचायतीने कोणत्याही ठिकाणाला परवानगी दिलेली नाही

Akshata Chhatre

धारगळ: येत्या डिसेंबरच्या अखेरीस गोव्यात ‘सनबर्न ईडीएम’ फेस्टीव्हलचे आयोजन करण्‍यात येणार आहे, मात्र उत्तर तसेच दक्षिण गोव्यातून या कार्यक्रमाला विरोध केला जातोय. यालाच अनुसरून स्थानिक भारत नारायण बागकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहितार्थ एक याचिका सादर केली होती.

या याचिकेला उत्तर देताना सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलला अजूनही राज्य सरकारने तसेच धारगळ पंचायतीने कोणत्याही ठिकाणाला परवानगी दिलेली नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात बुधवारी सुनावणीवेळी देण्यात आली.

याचिकादार भरत बागकर याने धारगळ येथील हॉस्पिटल जवळची जागा सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलसाठी निवडण्यात येत असल्याचे नमूद करून सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी 9 डिसेंबरपर्यंत थोपवून ठेवली आहे. या फेस्टिव्हलच्या आयोजकांना परवानगीसाठी केलेल्या अर्जासंदर्भातची माहिती पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकादाराने या सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलसाठी धारगळ येथील जागेचा विचार करण्यात येत असल्याचा दावा केला होता. तसेच त्याला परवानगी दिली असल्यास ती मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती.

या फेस्टिव्हलच्या परवानगीसाठी आयोजकांनी अर्ज केला असून त्यावर अजून कोणताच निर्णय झालेला नाही किंवा परवानगी दिली गेलेली नाही, त्यामुळे सादर केलेली ही याचिका अपरिपक्व असल्याने ती निकालात काढावी, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली आहे.

जनहित याचिकेत सरकारसह पर्यटन संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), बार्देश - पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे उपविभागीय पोलिस अधिकारी, पेडणे पोलिस निरीक्षक, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळचे प्राधिकरण जलस्रोत खाते, धारगळ पंचायत सरपंच व सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्र सरकार तसेच सनबर्न फेस्टीव्हलचे आयोजन करत असलेली मे. स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT