Goa Cyber Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: चिंताजनक! गोव्यात 'सायबर गुन्‍ह्यांचे' प्रमाण वाढले; बार्देशमधील महिलेला लाखोंचा गंडा

Bardez Cyber Crime: राज्‍यात सायबर गुन्‍ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्‍या मे महिन्यात सायबर गुन्हेगारांनी गोव्यातील बार्देश तालुक्यातील आणखी एका महिलेला फसवले.गोवा पोलिसांनी लोकांमध्ये जागृती करण्‍यासाठी ‘सायबर सुरक्षा गोंय’ मोहीम सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bardesh Cyber Crime Fraud Case

पणजी: राज्‍यात सायबर गुन्‍ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्‍या मे महिन्यात सायबर गुन्हेगारांनी गोव्यातील बार्देश तालुक्यातील आणखी एका महिलेला फसवले. त्यांनाही या सायबर गुन्हेगारांनी आपण मुंबई क्राईम पोलिस असल्याचे सांगून त्यांच्या नावे ‘फेडेक्स’द्वारे आलेले पार्सल संशयास्पद आहे. त्याची तपासणी नको असल्यास २१ लाख १५ हजार ७४४ रुपये पाठवण्यास सांगितले.

या महिलेला गुन्हेगारांनी भारतीय स्टेट बँकेचे दोन वेगवेगळे खातेक्रमांक पाठवले. तिने ही रक्कम खात्यामध्ये जमा केली. हे दोन्ही खाते क्रमांक पैसे जमा झाल्यावर काही वेळाने बंद झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली होती.

गुन्हेगाराने या खात्यावरील ५ लाखांची रक्कम काढली असल्याचे पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केलेल्या तपासातून समोर आले होते.

त्याच्या आधारे तपासकाम करत राजस्थान येथील राम निवास याला अटक केली. या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराने वापरलेला एक मोबाईल, बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड जप्त केले आहे. याचा तपास निरीक्षक दीपक गडेकर हे उपअधीक्षक आशिष शिरोडकर व अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

‘सायबर सुरक्षा गोंय’ मोहीम

गोवा पोलिसांनी लोकांमध्ये जागृती करण्‍यासाठी ‘सायबर सुरक्षा गोंय’ मोहीम सुरू केली आहे. सण आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी त्याची जागृती करण्यात येत आहे. यासाठी आम्ही सायबर स्वयंसेवकांची एक टीमही तयार करत आहोत. इच्छुक cybercrime.gov.in वर नोंदणी करू शकतात. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० डायल करा किंवा cybercrime.gov.in ला भेट द्या, असे आवाहन पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT