पणजी: राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस ओसरला असून थंडीच्या चाहुलीसोबतच, दिवसेंदिवस कमाल तापमानात वाढ होत आहे. राज्यातील कमाल तापमानात एकेका अंशांनी वाढ होत असून आज राज्यात ३५.१ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. दुपारी १२ नंतर राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून घराबाहेर पडणे असह्य होत आहे. त्यामुळे काहींना छत्रीचा सहारा घ्यावा लागला.
कामानिमित्त घराबाहेर पडल्यास घामाच्या धारा लागत असून घरात पंखा किंवा एसीविना राहणे कठीण होत आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली उष्मा, रात्रीची थंडी आणि पहाटे पडणारे धुके अशा सततत्या हवामान बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून थंडी, खोकला व संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे.
राज्यात ७ नोव्हेंबरपासून सौम्य थंडीला सुरूवात झाली आहे. परंतु घाटालगतच्या भागात चांगली थंडी जाणवत आहे, शहरी भागात तसेच किनारी भागात अजून मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत नाही. या भागातील नागरिकांना उष्म्या अधिक त्रासदायक ठरत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत त्यांना देखील वाढलेल्या उष्म्यामुळे त्याचा परिणाम जाणवत आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी तसेच इतर आजाराचे रूग्ण रूग्णालयात येत आहेत. परंतु सर्दी, खोकला आदींचे रूग्ण पावसाळ्यात अधिक असतात त्यामानाने याकाळात कमी आढळतात. परंतु जर कोणत्याही नागरिकांला सर्दी, खोकला, ताप जाणवत असेल तर त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. ताप असेल तर तात्काळ जवळच्या रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. ऋतूमान बदलाच्या अनुषंगाने नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आरोग्य संचालनालयाच्या साथीचे आजार विभागाचे प्रमुख(नोडल अधिकारी) डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.