Subhash Phaldesai, E Rickshaw Dainik Gomantak
गोवा

E Rickshaw: ..लवकरच दिव्यांगांसाठी गोव्यात ई-रिक्षा! दिव्यांगजन आयुक्त, गोवा माईल्स यांच्यात करार

Subhash Phaldesai: या सहकार्य करारामुळे दिव्यांग व्यक्तींना उपजिविकेचे शाश्वत साधन मिळवणे शक्य होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या आर्थिक विकासामध्ये दिव्यांग नागरिकांचा सहभाग वाढावा आणि त्यांचेही आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा माईल्स यांनी हल्लीच एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सर्वसमावेशक गोवा उपक्रमाअंतर्गत पर्पल ई-रिक्षा सुरू करण्यात आली आहे. गोवा माइल्सच्या पोर्टलद्वारे ही सुविधा चालवली जाणार असल्याचे राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

यावेळी गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे माननीय मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वल्लावन (आयएएस), राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव श्री. ताहा हाजिक, गोवा माईल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. उत्कर्ष सुधीर दाभाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

सुभाष फळदेसाई म्हणाले की, या सहकार्य करारामुळे, दिव्यांग व्यक्तींना उपजिविकेचे शाश्वत साधन मिळवणे शक्य होणार आहे तसेच इतरांवर विसंबून न राहता फिरण्याचे स्वातंत्र्यदेखील त्यांना मिळणार आहे. गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये अधिक सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

SCROLL FOR NEXT