E Rickshaw : व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षेचा 197 दिव्यांगांनी घेतला लाभ

व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी हस्ते करण्यात आले.
E- Riksha
E- RikshaGomantak Digital Team
Published on
Updated on

E Rickshaw : दिव्यांगजन व्यक्ती आणि त्यांचा कुटुंबीयांसाठी स्वप्नवत असलेल्या व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी त्यांच्याच हस्ते करण्यात आला होता. ही सुविधा दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाची ठरत असून त्याबाबत समाधानही व्यक्त केले जात आहे.

मास्तिक पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी)ची समस्या असलेल्या साहित्यिक फ्रेडरिका मिनेझिस सांगतात, ‘व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा ही सेवा माझ्यासारख्या एखाद्या व्हीलचेअर वापरकर्त्यासाठी अतिशय उपयुक्त सेवा आहे. आता मला स्वतंत्रपणे राज्यात प्रवास करणे शक्य होत आहे. आजवर आमच्यासारख्या व्हीलचेअरची गरज असलेल्या लोकांना कोठेही प्रवास करण्यासाठी पूर्णपणे कुटुंबावर अवलंबून राहावे लागत होते.

E- Riksha
Mapusa News: म्हापसा सरकारी संकुलात पार्किंगचा बोजवारा

कारमधून प्रवास करावयाचा असेल तर व्हीलचेअरचे व्यवस्थापन करणे म्हणजे मोठे दिव्य ठरते. व्हीलचेअर कारमध्ये चढवणे, उतरवणे यासाठी एक मदतनीस लागतो. त्यामुळे अनेकदा मला प्रवास टाळण्याशिवाय गत्यंतर नसायचे किंवा तसा कधी प्रवास केला तरी व्हीलचेअरचे व्यवस्थापन करणे मोठे कटकटीचे व मनस्तापाचे काम ठरत असे.’

E- Riksha
Mopa Airport: मनोहर विमानतळावर आता होणार वेळेची बचत; चेक-इन, बॅगेज ड्रॉपसाठी जलद सुविधा कार्यरत

व्हीलचेअरसुलभ ई-रिक्षा सेवेचा दर हा वाजवी ठेवण्यात आला आहे. उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या दिव्यांगजनांना या सेवेसाठी मोठे शुल्क द्यावे लागणार नाही. ही सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वा. या वेळेत उपलब्ध होणार आहे.

गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन आयुक्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com