Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: साठवलेल्या खनिजाचा होणार 'ई-लिलाव'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

Minerals E Auction: हा खनिजाचा ३० वा ई-लिलाव असेल; खनिजाला टनमागे ८९५ रुपये दर

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: धक्क्यांवर तसेच इतर ठिकाणी साठवलेल्या २ दशलक्ष टन खनिजाचा ई- लिलाव पुकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा खनिजाचा ३० वा ई-लिलाव असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, खनिजाचे ४ साठे आहेत असे गृहित धरून हा लिलाव पुकारण्यात येणार आहे. या खनिजाला टनमागे ८९५ रुपये दर मिळेल, असा अंदाज आहे. राज्यात खनिज वाहतुकीस ऑक्टोबरमध्ये सुरवात होऊ शकेल. नोव्हेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू होणार आहे. एका खाणीत याआधीच उत्खनन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने लिलाव केलेल्या खाणपट्ट्यात त्या खाणीचा समावेश होता.

आणखी खाणपटट्यांचा सरकार लिलाव पुकारणार आहे असे सांगून ते म्हणाले, लिलावासाठी छाननी प्रक्रिया सध्या सुरू केली आहे. कुडणे आणि सुर्ला येथील काही खाणी सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. काहींनी पर्यावरण दाखल्यासाठी अर्ज केले असून लवकरच त्यांना ते मिळतील.

बार्देश, पेडणेत जमिनीच्या सरकारी दरात वाढ

बार्देश, पेडणे तालुक्यांत जमीन विक्रीचे प्रकार वाढल्याने तालुकास्तरीय किमान किमतीत बदल केला आहे. पूर्वी सरकारी दर ३ हजार रुपये प्रतिचौरस मीटर होता, तो वाढवून ८ हजार रुपये प्रतिचौरस मीटर केला आहे. मात्र भूखंडाचा आकार ५०० चौरस मीटरपेक्षा कमी असल्यास पूर्वीचाच दर लागू होणार अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT