CM Pramod Sawant, Budget Meeting X
गोवा

Goa Budget Proposal: लगेच प्रस्ताव सादर करा! अर्थसंकल्पीय तरतुदींना गती देण्यासाठी CM सावंतांनी घेतली बैठक

CM Pramod Sawant: घोषणांसाठी प्रस्ताव तयार करण्यावर उच्चस्तरीय पुनरावलोकन बैठक आयोजित केली गेली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगेच प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात केलेल्या आश्वासनांच्या जलद अंमलबजावणीसाठी आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांसाठी प्रस्ताव तयार करण्यावर आज उच्चस्तरीय पुनरावलोकन बैठक आयोजित केली गेली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगेच प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, की केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणांसाठी आपले प्रस्ताव पहिल्याच दिवशी पाठवले जावेत. मुख्य सचिव व्ही. कांदावेलू, राज्य सरकारचे सचिव, दोन्ही जिल्हाधिकारी, वित्त खात्याचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, एप्रिल अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी निर्देशित केले आहेत. या बैठकीमध्ये सार्वजनिक सेवांचा वितरण सुधारण्यावर तसेच आगामी निती आयोगाच्या बैठकीची तयारी यावरही चर्चा करण्यात आली.

राज्य सरकारने पाच महिन्यांचे लेखानुदान विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. त्या निधीच्या विनियोगासाठी खात्यांकडून राज्य व केंद्र सरकारकडे वेळेत प्रस्ताव पोचणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय मागण्या पाठवल्यानंतर प्रस्तावही लगेच पाठवावेत, याकडे या बैठकीत खाते प्रमुखांचे लक्ष वेधण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT