Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

टॅक्सीमध्ये डिजिटल मीटरचा वापर सुरू करा - मंत्री गुदिन्हो

सरकारकडून विलंब होत असल्याचा नागरिकांचा दावा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील टॅक्सीमध्ये बसवण्यात आलेले डिजिटल मीटर वापरला जात नसल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी याची गंभीर दखल घेत टॅक्सी मालकांना मीटर वापरासंबंधी सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे सरकार आणि टॅक्स संघटनांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. परंतु, लवकरात लवकर मीटरचा वापर करण्याबाबत सरकार अजूनही का विलंब करत आहे, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे.

राज्यात येणारे पर्यटक आणि स्थानिकांना दिलासा देण्यासाठी टॅक्सीमध्ये मीटर बसवण्याची मागणी जोर धरत होती. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्‍या गोवा खंडपीठाने सक्ती केल्‍यानंतर मीटर बसवण्यात आले होते. परंतु, त्यांचा वापर केला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मीटर वापरले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे. त्यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अजूनही सरकारकडून काही ठोस कारवाई झालेली दिसत नाही.

मॉन्सून असूनही राज्यात मोठ्या संख्येत पर्यटक येत आहेत. यात मीटरचा वापर होणे आवश्‍यक असल्‍याचे मत पर्यटन उद्योगातील भागीदारांकडून व्यक्त होत आहे. गेले काही दिवस टॅक्सीमधील मीटरवरुन अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे मंत्री गुदीन्हो यांनी बऱ्याचदा सांगितले आहे. मात्र तरी ही पर्यटकांना याबाबतीत समस्या जाणवत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT