Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

सामाजिक योजनांचे रखडलेले पैसे मिळणार 19 डिसेंबरपूर्वी; CM सावंत

राज्य सरकारने सुरू केलेल्‍या महिलांसाठीच्या विविध योजनांचे पैसे जानेवारी 2019 पासून रखडलेले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारने सुरू केलेल्‍या महिलांसाठीच्या विविध योजनांचे पैसे जानेवारी 2019 पासून रखडलेले आहेत. त्यामुळे लाभार्थींचे आर्थिकदृष्ट्या हाल होत असल्याचा प्रश्न पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी, या योजनांचे पैसे 19 डिसेंबरपूर्वी दिले जातील अशी ग्‍वाही दिली.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर आमदार खंवटे यांनी सरकारला धारेवर धरत लाडली लक्ष्मी, गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे अनेक दिवसांपासून मिळाले नसल्याचे सांगितले. त्‍यावर मुख्यमंत्री सावंत यांनी ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचे पैसे 2019 पासून मिळाले नाहीत हे खरे असले तरी काही रक्कम देण्‍यात आली आहे. केवळ अविवाहित मुलींचे पैसे बाकी आहेत, असे सांगितले. तसेच ‘गृहआधार’ व डीएसएसवाय योजनेचे पैसे चार महिन्यांपासून रखडले असून 19 डिसेंबरपर्यंत या सर्व लाभार्थींनाही पैसे दिले जातील, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT