St Xavier Feast Goa Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Feast: 'गोंयच्या सायबाच्या' फेस्ताची तयारी पूर्ण!! उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

St Francis Xavier Feast Goa: सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या आयोजनासाठी जय्यत तयारी केली

Akshata Chhatre

St Xavier Feast Preparations: जुने गोवे येथे बुधवारी (३ डिसेंबर) होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्या (St. Francis Xavier’s Feast) पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या आयोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, आयएएस यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जुने गोव्यात तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र माडकईकर, वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवोडकर, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालक, उपजिल्हाधिकारी (तिसवाडी), जुने गोवे पंचायतीचे प्रतिनिधी, चर्च प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

वाहतूक, सुरक्षा आणि गर्दीवर विशेष लक्ष

या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना आणि निर्देश दिले. यामध्ये प्रामुख्याने चार प्रमुख बाबींवर भर देण्यात आला:

वाहतूक व्यवस्थापन: फेस्ताच्या परिसरात वाहतूक (Traffic) सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी योजना राबवण्याचे आणि आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले.

अग्निसुरक्षा: अग्निसुरक्षा मानदंडांचे कठोरपणे पालन केले जात असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले.

गर्दीचे नियंत्रण: मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रभावी गर्दी व्यवस्थापन योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

आपत्कालीन मार्ग: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा होऊ नये म्हणून प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेले विक्रेते आणि फेरीवाले यांना त्वरित हटवण्याचे निर्देश देण्यात आले.

यासोबतच, सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे एकूण पालन सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या 'गोंयच्या सायबाचे' फेस्त सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT