Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: ‘एसटी’ आरक्षण 2027 मध्ये मिळणार: सभापती तवडकर

ST Reservation: राज्यात अनुसूचित जमातीतील काहीजण उगाचच ओरड करत आहेत. आरक्षणाबाबत ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

ST Reservation: राज्यात अनुसूचित जमातीतील काहीजण उगाचच ओरड करत आहेत. आरक्षणाबाबत ठोस पावले उचलण्यात आली आहेत. सरकारने 2027 पर्यंत हे आरक्षण लागू करण्याचे स्पष्ट केले असताना लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्याची केलेली मागणी म्हणजे सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांसमवेत आदिवासी समाजाचे मंत्री व आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती आदिवासी समाजाचे नेते व सभापती रमेश तवडकर यांनी आज एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली.

आदिवासी समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी 1996 पासून राज्यात चळवळ सुरू झाली होती. 2003 मध्ये भाजप सरकार सत्तेवर येताच गाकुवेधला आरक्षण मिळाले. मात्र त्यानंतर आलेल्या सरकार हे आरक्षणाबाबत संवेदनशील नसल्याने अनुसूचित जमातीला आरक्षणाचा प्रश्‍न अनेक वर्षे भिजत पडला.

2012 मध्ये पुन्हा भाजप सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर त्यामध्ये आदिवासी खात्याचा मंत्री होतो. त्या काळात या समाजासाठी अनेक योजना लागू केल्या.

2027 च्या निवडणुकीत ते दिले जाईल, असे राज्य व केंद्र सरकारनेही आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण लोकसभेपूर्वीच देण्याची काही समाजाच्या गटाकडून केली जात आहे, ती काहींना त्याचे राजकारण करण्यासाठी आहे, असे मत तवडकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Nightclubs Goa: गोव्यातील नाईट क्लब, डान्सबार अन् डिस्कोथेक बेकायदेशीर, राज्याच्या कायद्यात तरतूदच नाही; बड्या अधिकाऱ्याच्या खुलाशाने खळबळ

Arpora Nightclub Fire Case: 25 मृत्यूंची गंभीर दखल! हडफडे दुर्घटनाप्रकरणी मानवाधिकार आयोगाची मोठी ॲक्शन; मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालकांना समन्स

Luthra Brothers Arrested: लुथरा बंधूंच्या अटकेसाठी गृह मंत्रालयाचा मास्टर प्लॅन, पासपोर्ट निलंबित होताच थायलंडमध्ये राहणं झालं मुश्किल

Arpora Nightclub Fire Case: फरार क्लब मालकांचा खेळ खल्लास! लुथरा बंधू लवकरच गोवा पोलिसांच्या ताब्यात; चौकशीत महत्त्‍वपूर्ण माहिती हाती आल्‍याची चर्चा

Horoscope: भाग्याची साथ, कामात यश! 'या' राशींची आज प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT