St. Inez Building Demolition Dainik Gomantak
गोवा

St. Inez Building Demolition: सांतिनेज येथील जीर्ण इमारत पाडण्याच्या कामाला गती; शेजारच्या घराचे नुकसान

St. Inez Building Demolition: आल्तिनोकडे जाणाऱ्या मार्गावर उजव्या बाजूला नागवेकरांची जीर्ण झालेली पाच मजली जीर्ण झालेली इमारत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सांतिनेजमधील जीर्ण इमारत पाडण्याचे शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेले काम रविवारीही मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. दरम्यान, इमारतीच्या दक्षिणेकडील बाजूचा काही भाग हटवित असताना राजू मयेकर यांच्या घरावर पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, येथील सर्व स्थितीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित राहून देखरेख करीत आहेत.

सांतिनेजमधून आल्तिनोकडे जाणाऱ्या मार्गावर उजव्या बाजूला नागवेकरांची जीर्ण झालेली पाच मजली जीर्ण झालेली इमारत आहे. इमारत जीर्ण झाल्याने ती कधीही ढासळण्याची शक्यता यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती.

शनिवारी सायंकाळी मागील बाजूचा स्लॅब व काही भाग कोसळल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ इमारत पाडण्याचे काम हाती घेतले. या इमारतीच्या बाजूच्या चार घरांतील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत महानगरपालिकेने असुरक्षित म्हणून जाहीर केली होती. पण ती पाडण्याचे काम काही हाती घेतले नाही, अखेर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांनी तत्काळ ती पाडण्याचे आदेश करीत संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. त्यानुसार सायंकाळपासून अग्निशामक दल, महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने इमारत पाडण्याचे काम हाती घेतले. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हे काम सुरू होते.

आज सकाळी इमारत पाडण्याचे काम सुरू झाल्यानंतर सांतिनेत ते आल्तिनो हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शनिवारी सायंकाळी एका जेसीबीच्या साह्याने इमारत पाडण्याचे काम सुरू होते. परंतु रविवारी मात्र आणखी एक जेसीबी मागवण्यात आला. तिसवाडी तालुका मामलेदार कार्यालयातील कर्मचारी येथील स्थितीवर लक्ष ठेवून होते.

मयेकर कुटुंबाच्या घराचे नुकसान

या इमारतीचा भाग पाडत असताना शेजारी असणाऱ्या घरावरील सिमेंट पत्र्यावर तो पडला आणि मयेकर यांच्या घरातील पत्रा व सीलिंग तोडून आत पडला. त्यामुळे मयेकर यांच्या कुटुंबाच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक, नेमकं प्रकरण काय?

Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर थरार! दाट धुक्यामुळे आठ बस आणि तीन कारची टक्कर; 4 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Anjuna Illegal Hotel: मुख्‍य सचिवांसह 7 प्रतिवादींना नोटिसा, हणजूण येथील बेकायदा हॉटेल प्रकरणी याचिकेची दखल

गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

SCROLL FOR NEXT