St Francis Xavier Feast Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier Relics Exposition: दहा वर्षानंतर पाहायला मिळणार जगप्रसिद्ध फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष, जाणून घ्या तारखा

झेवियर यांच्या शवाचे अवशेष दहा वर्षातून एकदा लोकांना दर्शनासाठी खुले केले जातात.

Pramod Yadav

St. Francis Xavier Relics Exposition: ओल्ड गोव्यातील 'बॅसिलिका ऑफ बॉम जिझस' चर्चमध्ये असणारे जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष (St. Francis Xavier Relics Exposition) दर्शनासाठी खुले केले जाणार आहे.

झेवियर यांच्या शवाचे अवशेष दहा वर्षातून एकदा लोकांना दर्शनासाठी खुले केले जातात, त्यामुळे जगभरातील पर्यटकांसाठी ही संधी असणार आहे.

गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे.

दर 10 वर्षांनी अवशेष पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले केले जाते. यापूर्वी 2014-15 मध्ये अवशेष दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.

‘गोंयचो सायब’ नावाने प्रसिद्ध असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे 3 डिसेंबर 1552 रोजी चीनमधील शांगचुआन बेटावर निधन झाले होते.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष, जुने गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस (Basilica of Bom Jesus in Old Goa) येथे चांदीच्या ताबूतमध्ये जतन केले आहेत. दर दहा वर्षांनी या अवशेष सर्वांसाठी खुले केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT