St Francis Xavier Feast 2025 Dainik Gomantak
गोवा

St Xavier Feast: ओढ ‘गोंयच्या सायबा’च्या दर्शनाची! महाराष्ट्रातील 200 भाविक पायीवारी करत गोव्यात, 40हून अधिक वर्षांपासूनचा उपक्रम

St Francis Xavier Feast 2025: दोडामार्गमार्गे डिचोलीत पोचल्यानंतर या भाविकांनी सोमवारी रात्री शहरातील अवरलेडी सायबिणीच्या चर्च परिसरात मुक्काम केला. यामध्ये ख्रिशन बांधवांसह हिंदू बांधवांचाही समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: ‘गोंयच्या सायबा’च्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून यंदाही शेकडो भाविक पायीवारी करीत गोव्यात आले आहेत. यापैकी जवळपास दोनशे भाविकांनी सोमवारी रात्री डिचोलीत वास्तव्य केल्यानंतर (मंगळवारी) पहाटे हे भाविक जुने गोवे येथे जाण्यासाठी मार्गस्थ झाले.

दुपारपर्यंत हे भाविक जुने गोव्यात दाखलही झाले. बुधवारी (ता. ३) रोजी गोंयच्या सायबाचे अर्थात सेंट फ्रांसिस झेवियर यांचे फेस्त साजरे होणार आहे. या फेस्तात हे भाविक सहभागी होणार आहेत.

दोडामार्गमार्गे डिचोलीत पोचल्यानंतर या भाविकांनी सोमवारी रात्री शहरातील अवरलेडी सायबिणीच्या चर्च परिसरात मुक्काम केला. या भाविकांमध्ये ख्रिशन बांधवांसह हिंदू बांधवांचाही समावेश आहे.

रात्री या भाविकांनी अवरलेडी सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनाही केली. गोंयच्या सायबावर श्रद्धा ठेवून पायीवारीला प्रारंभ केल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. युवकांपासून सत्तरी ओलांडलेल्या भाविकांचाही यामध्ये समावेश आहे. काही भाविकांनी तर सोबत आपल्या तीन ते चार वर्षीय लहान मुलांनाही आणले आहे.

‘पायीवारी’ला इतिहास

सोळाव्या शतकातील संत फ्रान्सिस झेवियर हे सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे संत आहेत अशी भाविकांची भावना आहे आणि त्याच भावनेने गोंयच्या सायबाच्या फेस्तानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील भाविक दरवर्षी पायीवारी करीत जुने गोवे येथे येतात. यंदाही शेकडो भाविक गोव्यात आले आहेत. गेल्या चाळीसहून अधिक वर्षांपासून पायीवारीचा हा उपक्रम सुरू असून आता भाविकांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती संताजी लोबो यांनी दिली.

महाराष्ट्रातून पायीवारी

महाराष्ट्रातील आजरा आणि गडहिंग्लज येथील सेंट अँथनी चर्चकडून या पायीवारीला सुरवात झाली होती. भाविक पायीवारी करीत आजरा, नेसरी, भेडशीमार्गे काल सायंकाळी डिचोलीत पोचले. अन्य भागातून आलेले काही भाविक आजरा आणि भेडशी येथे पायीवारीत सहभागी झाले होते. या भाविकांमध्ये महिलांचाही समावेश आहे. सोमवारी सायंकाळी हे भाविक डिचोलीत पोचताच चर्चतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. चर्चतर्फे या भाविकांची चहापान आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT