Pope Francis Last Rites: भावनिक वातावरणात पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात; अंतिम दर्शनासाठी जवळपास 2 लाख लोकांची उपस्थिती

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला भावूक वातावरणात सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता (IST) व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या समोरील प्रसिद्ध बरोक प्लाझावर अंत्यसंस्काराला सुरुवात झाली.
Pope Francis Last Rites
Pope Francis Last RitesDainik Gomantak
Published on
Updated on

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला भावूक वातावरणात सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता (IST) व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या समोरील प्रसिद्ध बरोक प्लाझावर अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. जगभरातील कॅथोलिक समुदायासाठी अत्यंत भावनिक क्षणी जवळपास २ लाखांहून अधिक लोकांनी हजेरी लावली.

अंत्यसंस्कारानंतर पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव रोममधील सांता मारिया मॅगिओर बॅसिलिकामध्ये दफन करण्यात येणार आहे. २०१३ मध्ये पोप बेनेडिक्ट सोळाव्यांच्या राजीनाम्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी जगातील सर्वात कॅथोलिक समुदायाचे नेतृत्व स्वीकारले होते.

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला विविध देशांतील राजकीय आणि धार्मिक नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, तसेच अनेक युरोपीय आणि आफ्रिकन देशांचे नेते तसेच धर्मगुरु या सोहळ्यासाठी व्हॅटिकनमध्ये दाखल झालेत.

Pope Francis Last Rites
Goa Yachting: बेकायदा यॉटिंगवर होणार कारवाई, पंधरा दिवसांत नोंदणी करण्याचा पर्यटन खात्याचा आदेश

पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी २१ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले. त्यापूर्वी काही आठवडे ते दुहेरी न्यूमोनियाशी झुंज देत होते. त्यांच्या मृत्यूपूर्व काही तासांमध्ये त्यांनी ईस्टरच्या दिवशी शेवटचे सार्वजनिक दर्शन दिले होते.

अंत्यसंस्कारासाठी व्हॅटिकन आणि इटालियन प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली होती. हजारो पोलीस, सैनिक आणि स्वयंसेवकांनी सुरक्षेचे नियोजन केले होते. या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित असलेल्या श्रद्धाळूंनी, धर्मगुरूंनी आणि नेत्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाचा, गरीब व उपेक्षितांसाठी दिलेल्या आवाजाचा आणि जागतिक शांततेसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.

Pope Francis Last Rites
Cashew Season Goa: लागवड वाढली, उत्पादन कमीच! यंदाही काजू हंगामाची स्थिती बिकट; असंतुलित हवामानाचा बसतोय फटका

पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे केवळ कॅथोलिक समुदाय नव्हे तर संपूर्ण जगाने एक संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेते गमावले आहेत, अशी भावना जगभरातून व्यक्त होत आहे.पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला आज दुपारी १:३० वाजता (IST) व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बॅसिलिकासमोरील भव्य बरोक प्लाझा येथे सुरुवात झाली.

रोममधील सांता मारिया मॅगिओर बॅसिलिका येथे त्यांचे दफन करण्यात येईल. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com