EV Bus Services for Exposition Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier Exposition: सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळा, यात्रेकरुंसाठी 15 इलेक्ट्रिक बसेस तैनात; ईव्ही शटल सेवेचा घेता येणार अनुभव

EV Bus Services for Exposition: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनचा कार्यक्रम २१ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे, अवशेषांच्या प्रदर्शनावेळी समितीचा १५ इलेक्ट्रिक (EV) बसेस तैनात करण्याचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

EV Bus Services for Exposition, Old Goa

जुने गोवे: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनचा कार्यक्रम २१ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या प्रदर्शनावेळी यात्रेकरूंसाठी समितीने तीन मोक्याच्या ठिकाणी १५ इलेक्ट्रिक (EV) बसेस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर

अनेक भागांमधून सेंट झेवियर्स यांच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून समितीने तीन महत्वाच्या ठिकाणाहून प्रत्येकी पाच बसेस तैनाद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

यासाठी समितीने कदंबा ट्रान्सपोर्ट कोर्पोरेशनची (KTCL) मदत घेतली असून परिवहन मंडळाकडून २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी ९मी. रुंदीच्या इलेट्रीक बसेस दिल्या जाणार आहेत, याशिवाय कदंबाजवळ १२मी. च्या इलेट्रीक बसेस देखील आहेत.

समितीकडून जाहीर करण्यात आलेल्या तीन ठिकाणांमध्ये डेम्पो शिपयार्डजवळील बचिया प्रॉपर्टी, ओल्ड गोवा एज्युकेशन सोसायटी स्कूल ग्राउंड आणि मॉन्टफोर्ड मैदान यांचा समावेश आहे.

दिव्यांग लोकांसाठी बचिया प्रॉपर्टी येथे काही रिक्षा आणि बग्ग्यांची सोय करण्यात आलीये मात्र सुरक्षच्या दृष्टीने तपासणीनंतरच या प्रवाशांना प्रदर्शनात प्रवेश दिला जाईल. याशिवाय VIP लोकांसाठी प्रवासाची कशी आखणी करता येईल यावर अद्याप विचार सुरु आहे.

९ मी रुंदीच्या बसेस का?

काही यात्री पायी चालून यात्रा पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही ९मी रुंदीच्या इलेक्ट्रिक बसेस निवडल्या आहेत अशी माहिती दर्शन समितीचे संयोजक फादर हेन्री फाल्काओ यांनी एका इंग्रजी वर्तनामानपत्राला दिली. समितीकडून इलेट्रीक वाहनांची आखणी करण्यात आलीये त्यामुळे यात्रेकरूंना तिन्हीपैकी कोणत्याही एका पार्किंग साईटची निवड करावी अशी माहिती देण्यात आलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT