Pratima Kutinho Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

South Goa Protesters: 'गोयंच्या साहेबा'संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर उतरलेल्या दक्षिणेतील आंदोलकांनी माघार घेतली आहे.

Manish Jadhav

'गोयंच्या साहेबा'संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर उतरलेल्या दक्षिणेतील आंदोलकांनी माघार घेतली आहे. काहींचा राजकीय मायलेज घेण्याचा डाव लक्षात येताच एका गटाने आंदोलनातून माघार घेतली. मात्र, वेलिंगकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली आहे. कुतिन्हो यांनी सांगितले की, ''आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, पण आम्ही इथेच थांबणार नाही. सरकारच्या प्रत्येक चुकीच्या कामांचा पर्दाफाश करु राहू. आंदोलनकर्त्यांना विरोध थांबवण्याचे मी आवाहन करते.''

हिंदू संघटनांचा पाठिंबा

वेलिंगकरांच्या वक्तव्याचे राज्यातील काही हिंदू संघटनांनी समर्थन केले आहे. हिंदुत्ववादी संघटना वेलिंगकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. वेलिंगकर यांना समर्थन देण्यासाठी म्हापशात हिंदू संघटनांनी सभेचेही आयोजन केले.

गोवा पोलिसांची शोध मोहीम

दरम्यान, वेलिंगकरांना पकडण्यासाठी आता गोवा पोलिसांनी राज्यासह शेजारील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरु केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुभाष वेलिंगकर गायब आहेत. सीमावर्ती भागात पोलिसांनी ही मोहीम सुरु केली आहे. वेलिंगकरांच्या विरोधात राज्यात सध्या संतप्त भावना उमटत आहेत. गोव्यातील अनेक भागांमधून वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करणारी निवेदने सादर केली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT