Bashudev Bhandari Case Dainik Gomantak
गोवा

Bashudev Bhandari: अंधारात गाडी गेली नदीत, युवती बचावली पण 'तो' बेपत्ता; 'बाशुदेव' प्रकरणात 279 पानांचे आरोपपत्र दाखल

St Estevam River Accident: सांतइस्तेव्ह फेरीधक्क्‍याजवळ कार नदीत घुसून झालेल्‍या घटनेत बेपत्ता असलेला बाशुदेव भंडारी प्रकरणात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने २७९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गेल्या वर्षी ३१ ऑगस्टच्‍या रात्री सांतइस्तेव्ह फेरीधक्क्‍याजवळ कार नदीत घुसून झालेल्‍या घटनेत बेपत्ता असलेला बाशुदेव भंडारी (गुजरात) प्रकरणात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने २७९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्‍यात बेळगाव येथील दोघांची नावे असून ७७ साक्षीदारांची यादी समाविष्ट आहे.

या घटनेनंतर बाशुदेव बेपत्ता झाला तर त्याच्यासोबत असलेली युवती कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी एका दुसऱ्या वाहनाने त्यांचा पाठलाग केला होता. बाशुदेवचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नौदल, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा पथकांची मदत घेतली. मात्र, त्याचा शोध लागला नाही.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात संशयित आरोपींविरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक असलेले अनेक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

बाशुदेव भंडारी याच्या बेपत्ता होण्यामागच्या घटनांचा क्रम शोधण्यासाठी पोलिस पथक परिश्रमपूर्वक काम करत आहेत आणि हे आरोपपत्र या प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Human Animal Conflict: नेमकं हद्दीत घुसलंय कोण? माणूस की हत्ती?

Anganwadi: 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्‍युइटी, पीएफ, पेन्‍शनसह टॅबही द्यावा'! श्रीपाद नाईकांना निवेदन सादर

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

SCROLL FOR NEXT