Car Plunges into River at St Estevam Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: पाच दिवस उलटले गुजरातचा 'बशुदेव' अद्याप बेपत्ताच, सांतइस्तेव्ह येथे कालव्यात गेली होती कार

St Estevam Goa Accident Case: एक सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या अपघातात गुजरातचा बशुदेव भंडारी बेपत्ता झाला होता.

Pramod Yadav

St. Estevam Goa Accident

पणजी: सांतइस्तेव्ह येथे कुंभारजुवा कालव्यात कार जाऊन अपघात झालेल्या तरुण अद्याप सापडलेला नाही. पाच दिवसानंतर देखील बशुदेव भंडारी या युवकाचा शोध सुरुच आहे. बशुदेवचे पालक देखील गोव्यात दाखल झाले असून, गेल्या पाच दिवसापासून त्याचा शोध सुरु आहे.

बशुदेव भंडारी हा मूळ गुजरातचा रहिवासी असून, तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गोव्यात आला होता. रात्रीच्या सुमारास चारचाकीतून बाहेर पडलेल्या त्यांच्या कारचा माशेल येथे अपघात झाला. अपघात झालेल्या कार चालकाने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली अन् बशुदेव भरधाव वेगाने कार घेऊन फरार झाला.

पण, पुढे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार सांतइस्तेव्ह येथे कुंभारजुवा कालव्यात गेली. कारमध्ये असलेल्या त्याच्या मैत्रिणीला पोहता येत असल्याने ती सहज किनाऱ्यावर आली पण, बशुदेव मात्र बेपत्ता झाला. तेव्हापासून आज पाच दिवस उलटले तरी त्याचा शोध लागला नसून, त्याचे पालक चिंतेत आहेत.

बशुदेव गुगल मॅपद्वारे मिळेल त्या रस्त्याने गाडी हाकत होता. शिवाय पाठलाग करणारे कार चालक याची भीती देखील त्याच्या मनात होती. दरम्यान, रस्त्याचा अंदाज न आल्याने तो कारच कालव्यात गेला. पोलिस आणि बचाव पथकाचे कर्मचारी बशुदेवचा शोध घेतायेत.

या प्रकरणात पोलिसांकडून सर्व शक्यता खुल्या ठेऊन तपास केला जात आहे. एक सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT