Bashudev Bhandari Canva
गोवा

Saint Estevam Accident: 'बाशुदेव' प्रकरणात नवी अपडेट; तपासाबाबत CM सावंतांनी तरुणाच्या कुटुंबियांना काय सांगितलं?

St Estevam Tragedy: जुने गोवे पोलिस बेेपत्ता बाशुदेव भंडारीचे काय झाले, याचे उत्तर देण्यात अपयशी ठरल्याने या प्रकरणाचे तपासकाम त्यांच्याकडून काढून घेऊन गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची विनंती वडील नारायण यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली.

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Car Plunged Into Cumbarjua River Missing Bashudev Case

पणजी: गेल्या सव्वा महिन्यात जुने गोवे पोलिस बेेपत्ता बाशुदेव भंडारीचे काय झाले, याचे उत्तर देण्यात अपयशी ठरल्याने या प्रकरणाचे तपासकाम त्यांच्याकडून काढून घेऊन गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची विनंती वडील नारायण यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली. तपासकामात राहिलेल्या त्रुटींबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तपासकाम गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आश्वासन दिले.

बाशुदेव आणि त्याची मैत्रीण ३१ ऑगस्ट रोजी साखळी येथील एका हॉटेलात जेवल्यानंतर मध्यरात्री पणजीच्या (Panaji) दिशेने निघाले होते. वाटेत समोरून येणाऱ्या कारला त्यांच्या कारची धडक बसली. त्या कारमधील व्यक्तींनी त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. या गडबडीत सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावरून युवतीसह कारमध्ये बसलेला बाशुदेव बुडाला. त्यानंतर युवती पाण्याबाहेर आली; परंतु बाशुदेव बेपत्ता झाला आहे.

या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी त्याचे वडील नारायण व वडीलबंधू बलराम हे २ सप्टेंबरपासून गोव्यात तळ ठोकून आहेत. पोलिसांनी तपासात अनेक त्रुटी ठेवल्या. बाशुदेव पाण्यात बुडाला, असे गृहित धरूनच तपास केला. प्रत्यक्षात पोहता येणारा आणि कारमधील युवतीला वाचविणारा बाशुदेव बुडूच शकत नाही, ही शक्यता पोलिसांनी गृहित धरली नाही.

पाठलाग करणारे दोघेजण, जेवणावेळी उपस्थित असलेले दोन विद्यार्थी आणि बाशुदेवच्या कारमधील युवती यांना पोलिसांनी कधी संशयित म्हणून पाहिलेच नाही. त्यांची केवळ चौकशी करून त्यांना सोडून दिले. बाशुदेव २७ ऑगस्ट रोजी गोव्यात आला होता. त्याचदिवशी त्याचा मित्र कल्पराज आपल्या मैत्रिणीसह गोव्यात आला होता. त्याच्याकडूनही अधिक माहिती काढून घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही, असे नारायण यांना वाटते.

बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बाशुदेवचे वडील नारायण यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची साखळी येथील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली. उद्या तसा आदेश पोलिस महासंचालकांकडून जारी केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

Shubman Gill Video: 'मी पण पाकिस्तानी फलंदाज नाही...', शुभमन गिलचं सडेतोड उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

Goa Live News: गणेश विसर्जनासाठी 'दृष्टी मरीन'चे 47 ठिकाणी जीवरक्षक राहणार तैनात, भक्तांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

SCROLL FOR NEXT