Goa Crime Canva
गोवा

Saint Estevam Accident: महिना उलटला तरी निष्कर्ष नाही! 'बाशुदेव'ला शोधण्यासाठी क्राईम ब्रँचला पाचारण

St Estevam River Tragedy: रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार घटनेच्या वेळी कार बाशुदेवच चालवत होता. त्याच्यासोबतच्या तरुणीची पोलिसांनी कसून चौकशी केली. बाशुदेव बुडाला की, बेपत्ता झाला याबाबतचा निष्कर्ष पोलिसांना काढता आलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Car Plunged Into Cumbarjua River Missing Bashudev Case

पणजी: सांतइस्तेव येथील आखाडा फेरी धक्क्याच्या ठिकाणी कार नदीत जाऊन चालक बाशुदेव भंडारी हा बेपत्ता झाला होता. महिना उलटला तरी त्याला शोधण्यास पोलिसांना यश आले नाही. जुने गोवे पोलिसांनी शोधासाठी यंत्रणा पणास लावली, मात्र तपासाची दिशा मिळालेली नाही. बाशुदेवचे वडील व भाऊ हे तपास यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. पोलिस तपासात काहीच निष्पन्न होत नसल्याने त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सरकारने हा तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग केला आहे.

मूळ नेपाळी मात्र गुजरात येथे स्थित बाशुदेव भंडारी हा साखळी येथील गोवा इन्‍स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यास आला होता. ते दोघेही ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री बाणस्तारीमार्गे कांदोळी येथे जात असताना एका कारला धडक दिली. या कारच्या चालकाने बाशुदेव गाडीचा पाठलाग केल्याने भयभीत होऊन चुकीने आखाडा येथील धक्क्याच्या दिशेने नेली व कार नदीत गेली होती.

पोलिसांकडून अद्याप निष्कर्ष नाही

रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार घटनेच्या वेळी कार बाशुदेवच चालवत होता. साखळी ते घटनास्थळ या दरम्यान वाटेत ही कार थांबली नव्हती, हेही सीसीटीव्हीत दिसून आले होते. त्याच्यासोबतच्या तरुणीची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, ती पाण्याबाहेर आल्यानंतर बाशुदेव मागून आलाच नाही, असे सांगितले होते. त्यामुळे बाशुदेव बुडाला की, बेपत्ता झाला याबाबतचा निष्कर्ष पोलिसांना काढता आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT