Goa Congress 
गोवा

ST समाजाच्या नेत्यांना गोव्याचा CM होण्याची संधी मिळायला हवी; आरक्षणाचा प्रश्न निकालात काढणार - काँग्रेस

Goa Congress: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित न करून,अडवाणीजींना भारतरत्न प्रदान करताना मोदींनी दोघांचाही आदर केला नाही.

Pramod Yadav

Goa Congress

गोव्यातील अनुसुचित जमातीला वनहक्क कायद्यातील दावे निकाली काढण्यासोबतच राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन काँग्रेसने शनिवारी दिले. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर या समुदायाला न्याय देणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी एसटी समाजाच्या नेत्यांना मिळायला हवी, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले.

काँग्रेस हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपने केवळ राजकीय फायद्यासाठी अनुसूचित जमात समाजाचा वापर केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेस एसटी विभागाचे अध्यक्ष रामकृष्ण जल्मी, जीपीसीसी सरचिटणीस आणि एसटी नेते जोसेफ वाझ आदी उपस्थित होते.

भाजपचा अजेंडा एसटीविरोधी आहे. भाजपने राजकीय फायद्यासाठी एसटी समाजाचा वापर केला, परंतु त्यांची राजकीय आरक्षण व इतर मागण्या कधीच पूर्ण केल्या नाही. आम्ही या समस्यांना प्राधान्य देऊ आणि त्या सोडवू, असे आश्वासन माणिकराव ठाकरे यांनी दिले.

केंद्रात आणि गोव्यात सरकार आल्यानंतर एसटी समाजाचे प्रश्न सोडवू. अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी त्यांच्या कल्याणासाठी वापरला जातो हे आम्ही पाहू, असेही ठाकरे म्हणाले.

एसटीला राजकीय आरक्षण देण्यात भाजप अपयशी ठरल्याचा आरोप अमित पाटकर यांनी केला. काँग्रेसचे सरकार आल्यावर अनुसूचित जमातीचे क्षेत्र अधिसूचित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

वन हक्क कायद्यासाठी राष्ट्रीय मिशन स्थापन करू. सर्व प्रलंबित एफआरए दाव्यांचे निपटारा एका वर्षात केले जाईल आणि नाकारलेले दावे सहा महिन्यांत निकाली काढले जातील, असे पाटकर म्हणाले. गोव्यात 9500 प्रकरणे प्रलंबित आहेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT