apeksha Bolnekar Dainik Gomantak
गोवा

SSC Result 2024 : काणकोण केंद्रातून अपेक्षा बोळणेकर प्रथम; ९५.३२ टक्के गुण

SSC Result 2024 : मल्लिकार्जुन विद्यालयाचा निकाल ९८ टक्के

गोमन्तक डिजिटल टीम

SSC Result 2024 :

काणकोण केंद्रातून दहावीच्या परीक्षेत चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या अपेक्षा बोळणेकर ९५.३२ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला आहे.

पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयाचा निकाल ९६.९८ टक्के लागला आहे. विद्यालयातून मारिया रोमाल्ड अल्फान्सो ही ८९.७७ टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. लोलये येथील दामोदर विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला आहे. पणसुले येथील श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला असून अमरजीत हा विद्यार्थी प्रथम आला आहे.

माशे येथील श्री निराकार विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या विद्यालयातून ओमप्रकाश संदेश फळदेसाई हा ९४ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. भाटपाल येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

‘जगा आणि जगू द्या’

काणकोण केंद्रातून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या ६६० विद्यार्थ्यांमधून ६३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी उच्च टक्केवारी घेतलेली मुले उच्च शिक्षणासाठी मडगाव किंवा अन्य शहरांमध्ये जाणार आहेत, तर काही आयटीआय प्रवेश घेणार आहेत. यापैकी १३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अन्य शहरांत गेल्यास काणकोणात फक्त ४०० विद्यार्थी राहणार आहेत.

काणकोणमध्ये पाच उच्च माध्यमिक विद्यालयात १६ तुकड्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तुकडीच्या वाट्याला फक्त २५ विद्यार्थी येणार आहेत. त्यामुळे ‘बळी तो कान पिळी’ अशाप्रकारचे धोरण न जपता ‘जगा आणि जगू द्या’ असे धोरण सर्वच शैक्षणिक संस्थांनी राबविणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निवृत्त मुख्याध्यापक उल्हास पै भाटीकर यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT