37th National Games Dainik Gomantak
गोवा

37th National Games: ‘क्रीडा पर्यटन’ ठरेल गोव्याची नवी ओळख- सावंत

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games Goa Logo Unveiled: गोवा पर्यटनासाठी ओळखला जातो. आता 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्य पूर्णपणे सज्ज झाले असून साधनसुविधाही तयार झाल्या आहेत. यामुळे यापुढे क्रीडा पर्यटन ही गोव्याची नवी ओळख बनेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज व्यक्त केला.

तर यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 43 खेळांचा सहभाग असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) संयुक्त सचिव कल्याण चौबे यांनी केली.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या लोगोचे रविवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये शानदार समारंभात धनुष्याने नेम साधत सावंत यांनी लोगोचे अनावरण केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेच्या लोगोद्वारे गोव्याचा अभिमान, कौतुक प्रकट होत असल्याचे नमूद केले. ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा लोगो कालातीत, अद्वितीय आणि बहुविध गोवा प्रदर्शित करणारा आहे. या लोगोत गोव्याची आद्याक्षरे, नकाशा, चैतन्य, प्रेरणा, संस्कृती, जीवनशैली दडलेली आहे,’ अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘गेली दहा वर्षे आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची वाट पाहत होतो. आता तो दिवस, ते वर्ष उजाडले आहे. आम्ही राष्ट्रीय क्रीडा आयोजनासाठी पूर्ण सज्ज आहोत. स्पर्धेमुळे राज्यातील क्रीडा पर्यटनासही बळकटी येईल.

आम्ही ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे आयोजित करू. राज्यातील प्रत्येकाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग असेल. नक्कीच ही स्पर्धा यादगार ठरेल.’ यापूर्वीही गोव्याने आंतराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या स्पर्धा घेतल्या आहेत. आमचे कौतुकही झालेय.

राष्ट्रीय स्पर्धेमुळे साधनसुविधांत वाढ झाली आहे. राज्यात क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आम्ही आयोजकांचे स्वागत करत आहोत व त्यांना सर्व सहकार्य केले जाईल. भविष्यात क्रीडा पर्यटन ही गोव्याची नवी ओळख असेल, हे मी वचन देतो, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा योग्य

खेलो इंडिया केंद्रांद्वारे देशातील प्रत्येक गावातील, कानाकोपऱ्यातील क्रीडा गुणवत्ता हुडकून ती विकसित केली जाईल. त्यामुळे ऑलिंपिक पोडियम उद्दिष्ट साध्य होईल, असे क्रीडा राज्यमंत्री प्रामाणिक म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ही एकदम योग्य जागा असून क्रीडा साधनसुविधांच्या दृष्टीने आदर्श ठरल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

इतर खेळांतही मिळेल ओळख

आयओएचे संयुक्त सचिव कल्याण चौबे म्‍हणाले, पूर्वी गोवा फुटबॉलसाठी ओळखला जात असे. मी येथे फुटबॉलपटू या नात्याने भरपूर खेळलो आहे.

राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे इतर खेळांतही गोव्याची ओळख निर्माण होत आहे. राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 खेळ असतील. हा स्पर्धेच्या इतिहासातील विक्रम आहे.

रोपट्यांना पाणी; अनोखा संदेश :

लोगो अनावरण करण्यापूर्वी कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने उद्‍घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सावंत, केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक व श्रीपाद नाईक, गोविंद गावडे व मान्यवरांनी व्यासपीठाखालील रोपट्यांना सजवलेल्या तांब्यातून पाणी घालत वृक्षवाढीचा संदेशही दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: अर्जुन तेंडुलकर, कौशिकचा भेदक मारा! पाहुणा संघ बॅकफूटवर; ललित यादवने टिपले 2 बळी

Stray Dogs: पर्यटकांवर हल्ला, वाढती संख्या; गोव्यात 'भटक्या कुत्र्यांच्या' समस्येबाबत होणार चर्चा, मुख्‍य सचिव घेणार अधिकाऱ्यांची बैठक

Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

Kaalbhairav Jayanti 2025: कोण सर्वश्रेष्ठ? ऋग्वेदाचे उत्तर ऐकून ब्रम्हदेव हसले, भगवान शंकरानी धड वेगळे केले; कालभैरवाच्या अवताराची कथा

SCROLL FOR NEXT