बिबट्याचा ठिय्‍या माडावर, वनखात्‍याचे कर्मचारी मागावर

सावईवेरेतील प्रकार : दिवस सरला, रात्र झाली तरीही तळ कायम : नागरिकांची पाचावर; अतिउत्साही बघ्यांची गर्दी
Leopard
Leopard Dainik Gomantak
Published on
Updated on

Leopard बिबट्या हा प्रचंड चपळ प्राणी. मात्र, तो जेव्‍हा भक्ष्‍याच्‍या आशेने उंच माडावर ठाण मांडतो तेव्‍हा? सावईवेरे-कुळणवाड्यावरील भरवस्तीमध्‍ये रविवारी सकाळी 8 वा. च्‍या सुमारास असा दुर्मीळ प्रकार घडला.

एकीकडे ग्रामस्‍थांत भीती, तर दुसरीकडे अतिउत्‍साही तरुणांना कमालीचे कुतूहल अशा संमिश्र वातावरणात बघ्‍यांची गर्दी उसळली.

दाखल झालेल्‍या वन खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत बिबट्याला जमिनीवर आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू होते. पण, बिबट्या काही वधला नाही. काळोखातही त्‍याने माड सोडला नव्‍हता.

Leopard
Calangute Crime News: गोव्यातील भाड्याची वाहने कोल्हापूरात विक्री करणाऱ्या दोघांना अटक

कुळणवाडा हा कुळागरांचा भाग असल्याने येथे नसर्गिक जलस्रोत आहेत. या वाड्याच्या मागील बाजूला जंगल असल्याने शनिवारी (ता.13) रात्रीच्या वेळी रानातून भुकेने व्याकूळ झाल्याने भक्ष्याच्‍या शोधात बिबट्या या वाड्यात शिरला असावा, असा वन अधिकाऱ्यांनी अंदाज व्‍यक्‍त केला आहे.

मात्र, कुत्र्यांच्या भुंकण्याने किंवा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने बिथरलेल्या बिबट्याने अशोक सावईकर यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडाचा आधार घेतला असावा, असाही एक कयास आहे.

सकाळी 8 वा.च्या सुमारास घरमालक बाहेर येताच त्यांच्या घराशेजारीच नारळ पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी सहज माडावर नजर टाकताच त्यांना बिबट्याचे दर्शन झाले व या कुटुंबातील सर्व मंडळींची घाबरगुंडी उडाली. याबाबतची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पहिल्यांदाच घडले दर्शन

बिबट्याला पाहण्यासाठी व त्याचा फोटो काढण्यासाठी बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. सोशल मीडियावर बिबट्याचा फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले. पहिल्यांदाच या भागात बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Leopard
Calangute Mobile Theft: पर्यटकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

फटाक्यांचा प्रयोगही अयशस्वी

  • ‘बिबट्या माडावर’ ही वार्ता सोशल मीडियाद्वारे सचित्र राज्‍यभर पसरली. परिसरातून लोक बिबट्याला पाहायला येऊ लागले.

  • वन खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांनी गर्दी पांगवली. पोलिसही घटनास्‍थळी दाखल झाले.

  • बिबट्याला यंत्राद्वारे खाली आणणे कठीण आहे.

  • तो आपोआप जमिनीवर येण्याखेरीज कोणताही उपाय नाही.

  • बिबट्या दोन ते तीन वर्षांचा आहे. रात्री फटाके वाजवून तो खाली उतरतो का, हे पाहण्‍यात आले. मात्र, यश आले नाही.

  • माडाखाली मांस वा भक्ष्‍य ठेवून बिबट्याला ‘ट्रॅप’ करण्‍याचा विचार वन खात्‍याचे कर्मचारी करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com