Ironman 70.3 Goa Dainik Gomantak
गोवा

Ironman: धक्कादायक! गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेदरम्यान कोसळलेल्या 'त्या' स्पर्धकाचा मृत्यू

दोना पावला येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असताना दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला.

Pramod Yadav

Ironman 70.3 Goa: ‘आयर्नमॅन 70.3’ या जगातील एक अवघड स्पर्धा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्पर्धेचे पणजीत रविवारी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान, एक स्पर्धेक अचानक कोसळला, या स्पर्धकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कामाख्या सिद्धार्थ (वय 26) असे मृत्यू झालेल्या स्पर्धकाचे नाव आहे. दोना पावला येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी उपचारादरम्यान, त्या स्पर्धकाचा मृत्यू झाला आहे.

दोना पावला येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असताना दुपारी त्याने अखेरचा श्वास घेतला.

स्पर्धेच्यापूर्वी दोन दिवस अगोदर सिद्धार्थला ताप भरला होता, असे असताना देखील त्याने स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेदरम्यान शरीरावर ताण आल्याने तो अचानक कोसळला.

सिद्धार्थला उपचारासाठी दोना पावला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना सिद्धार्थचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT