Senior Literary Avadhoot Kudtarkar  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude : अवधूत कुडतरकर यांना सर्वतोपरी मदत करणार

Govind Gaude : मंत्री गोविंद गावडे कृतज्ञता निधीचा अर्ज भरून घेण्यासाठी अधिकारी पोचले निवासस्थानी

गोमन्तक डिजिटल टीम

Govind Gaude : मोरजी, गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक तथा उगवे गावचे रहिवासी अवधूत यशवंत कुडतरकर हे सध्या हलाखीचे जीवन जगत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने त्या वृत्ताची दखल घेत कुडतरकर यांना सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.

कला आणि सांस्कृतिक खात्याअंतर्गत कृतज्ञता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री गोविंद गावडे यांच्या सूचनेनुसार खात्याचे संचालक सगुण वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गडेकर व राजेश रमेश महाले यांनी उगवे येथे कुडतरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. घेतली.

यासंदर्भात मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, कोणत्याही कलाकाराला किंवा साहित्यिकाला त्यांचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. कुडचडकर यांना सरकारकडून योग्य ती मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे.

मदतीसाठी अनेक हात

ज्येष्ठ साहित्यिक अवधूत कुडतरकर हे आपल्या वयोवृद्ध पत्नीसोबत मोडकळीस आलेल्या घरामध्ये राहत आहेत. त्यांची स्थिती हलाखीची आहे.

कुणी तरी नातेवाईक कधी तरी त्यांना आर्थिक मदत करतो, कडधान्य देतो. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरकार तसेच सेवाभावी संस्था, राजकीय नेते, उद्योगपतींनी कुडतरकर यांना मदत करण्यासाठी हात पुढे केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT