Gymnastics competition Dainik Gomantak
गोवा

मडगाव येथील जिमनॅस्टिक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार दिगंबर कामत ही होते उपस्थितीत

दैनिक गोमन्तक

मडगाव: जिमनॅस्टिक ट्रेनिंग सेंटर आके मडगाव तर्फे गुजराती समाज येथे इंटर सेंटर पातळीवरील चौथी चॅम्पियनशिप २०२२ अंतर्गत फ्लोअर, बॅलन्सिंग बीम व टेबल व्हॉल्ट स्पर्धा़ंचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण ७७ मुलांनी भाग घेतला. या उद्घाटन समारंभास उद्योजक विजय अवदी, आरोग्याधिकारी डॉ. विंदा पै दुकळे, निवृत्त हायस्कूल हेडमास्टर रंजन नाईक, जिमनॅस्टिक सेंटर संचालिका शीतल ढेरे व स्पर्धा संचालक प्रताप ढेरे उपस्थित होते.(Spontaneous response to gymnastics competition at Madgaon)

सकाळच्या सत्रात आठ वर्षे वयोगटातील जिमनॅस्टिक फ्लोअर स्पर्धेतील ३५ मुलांना पारितोषिक वितरण समारंभास नावेलीचे आमदार उल्हास तुयेंकर, विजय अवदी, डॉ विंदा पै दुकळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य व कास्य पदके प्रदान करण्यात आली. संध्याकाळी दुसऱ्या सत्रात फ्लोअर, बॅलन्सिंग व टेबल व्हॉल्ट स्पर्धेत पन्नास विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

पारितोषिक वितरण समारंभास मडगावचे आमदार दिगंबर कामत प्रमुख अतिथी होते. मडगांव नगरपालिका उपनगराध्यक्ष दीपाली सावळ सन्माननीय अतिथी तर मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक दामोदर शिरोडकर, गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्टचे चेअरमन मुकेशभाई सगलानी, निवृत्त हायस्कूल हेडमास्टर रंजन नाईक विशेष निमंत्रित होते.त्यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके वितरित करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार दिगंबर कामत म्हणाले, पूर्वी बहुतेक करून खेळ केवळ मनोरंजन व वेळ घालवण्यासाठी खेळले जात असत. परंतु आज खेळांत क्रीडापटूंना देश परदेशातही आपली चमक दाखवत प्रसिद्धी मिळवून आपले भविष्य घडविण्यात आधारभूत ठरते. मुकेश सगलानी यांनीही यावेळी विचार मांडले.

तरूण करमाकर, तन्वेश गावडे, मौसी घोष, लाला मोहतो, यांनीं स्पर्धांचे परिक्षण केले. प्रारंभी शीतल ढेरे यांनी़ उपस्थितांचे स्वागत केले. रंजन नाईक यांनी दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन केले. अभिजीत ढेरे ( एशियन गेम्स २०१८ कांस्य पदक विजेता ) चहक गोयल, आर्ची काटकर, अंबिका भोरे व स्वरा कोले यांनीं जिमनॅस्टिकच्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिके याप्रसंगी सादर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT