Gomantak Cooking Competition  Dainik Gomantak
गोवा

Gomantak Cooking Competition : ‘गोमन्तक’ पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तेजा भाटकर प्रथम, साधना सिलिमखान द्वितीय, तर शीला नाईक यांना तृतीय क्रमांक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Gomantak Cooking Competition : महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पर्दापण करत पुढाकार घेणे गरेजेचे आहे. समाजाला सतावणाऱ्या विविध विषयांवर भाष्य करणे गरजेचे आहे. ‘गोमन्तक-सकाळ’द्वारे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिकली म्हणून दै. ‘गोमन्तक’ व ‘अमूल’ दूध संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी पौष्टिक आहार या विषयावर आधारित पणजी भगिनी मंडळ कार्यालयात आयोजित पाककला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक तेजा भाटकर यांना प्राप्त झाले, तर द्वितीय - साधना सिलिमखान, तृतीय - शीला नाईक यांना बक्षिसे मिळाली.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, ‘अमूल’चे गोवा प्रभारी संतोष मेंगाने, उत्तर गोवा विक्री प्रमुख शिवाजी देशमुख, दै. ‘गोमन्तक’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरुण पाटील, भारत पोवार, पणजी भगिनी मंडळाच्या उज्ज्वला तारकर व मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण उज्ज्वला तारकर व रती नायक यांनी केले.

स्पर्धेतील सहभागी महिला

नीता कुंडईकर, मिता वाघ, नीता पै बीर, साधना सिलिमखान, दीपा खैर, सोनाली पै, शीला नाईक, माधवी सिलिमखान, सुजाता नाटेकर, श्‍वेता गायतोंडे, वृंदा येंडे, सुनिता घोसरवाडीकर, सरिता साळगावकर, प्रिता साळगावकर, कांती मयेकर, कल्पना तारी, मेघा राव, तेजा भाटकर, कोमल कुडतरकर, सुनिता दुभाषी, रसिका मयेकर, सुरेखा प्रभू, शिल्पा कामत, जिविता पांडे, अनुराधा नाईक यांनी या पाककलेत सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT