Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा इंडिया आघाडीत फूट! 'आप'च्या मतदारसंघात काँग्रेस देणार स्वतंत्र उमेदवार, वेन्झी व्हिएगसना प्रत्युत्तर

Goa AAP X Congress India Alliance: आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबरची युती तोडली असून त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa India Alliance

सासष्टी: गोव्यात इंडिया आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी २०२७ मध्ये बाणावली मतदारसंघात काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार असेल आणि तो जिंकूनही येईल, असा दृढ आत्मविश्वास व्यक्त केला.

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस दक्षिण आणि उत्तर गोवा या ठिकाणी जिल्हा पंचायतीच्या सर्व ५० जागा लढविणार असल्याचे शनिवारी (०७ डिसेंबर) त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या प्रदेश समितीची हल्लीच बैठक झाली. या बैठकीत गोव्यात काँग्रेसला पोषक असे निर्णय घेण्यात आल्याचे सावियो डिसिल्वा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

गोव्यात काँग्रेसची राज्य समिती आहे. त्याचबरोबर तीन आमदार आणि एक खासदारही आहे. त्यामुळेगोव्यात काँग्रेस संपली किंवा कॉंग्रेस गोव्यातून हद्दपार होईल, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बाणावलीत काँग्रेसला तब्बल १४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत १६ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे काँग्रेस बाणावलीत अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

'आप'चे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी शुक्रवारी काँग्रेसने 'एकला चलो' धोरण अवलंबले तर काँग्रेस पक्ष गोव्यातून हद्दपार होईल, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सावियो डिसिल्वा यांनी पक्षाची बाजू मांडली.

दिल्लीत सवता सुभा, मग गोव्यात युती का?

आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसबरोबरची युती तोडली असून त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत गोव्यात त्यांना युती का हवी हा प्रश्न आहे, असे डिसिल्वा म्हणाले.

जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार ठेवला नाही; कारण केवळ दीड वर्षांची मुदत होती. मात्र, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुखावले गेले. गोव्यात युती पाहिजे की नाही, याचा लोक त्याचप्रमाणे पक्षाचे स्थानिक नेते निर्णय घेतील, असेही डिसिल्वा यांनी सांगून टाकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT