Spirit of Goa Festival  Dainik Gomantak
गोवा

Spirit of Goa Festival: 'स्पीरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल' रद्द! शिरगाव दुर्घटनेनंतर पर्यटन विभागाचा मोठा निर्णय

Spirit of Goa Festival Cancelled After Lairai Tragedy: श्री देवी लईराई जत्रोत्सवात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाने स्पीरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल रद्द करण्याची घोषणा केली.

Manish Jadhav

पणजी: शिरगाव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाच्या जत्रोत्सवात मोठी दुर्घटना घडली. शनिवारी (3 मे) पहाटे जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक भक्त गंभीर जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता पर्यटन विभागाने कोलवा येथे होणारा स्पीरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल रद्द केला. तर सरकारकडून पुढील तीन दिवसांत होणारे सर्व सरकारी समर्थित कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सव रद्द किंवा पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले.

स्पीरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल रद्द

दरम्यान, श्री देवी लईराई जत्रोत्सवात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाने स्पीरिट ऑफ गोवा फेस्टिव्हल (Spirit of Goa Festival) रद्द करण्याची घोषणा केली. शनिवारी आणि रविवारी म्हणजेच 3 आणि 4 मे रोजी कोलवा येथील एसएजी ग्राऊंड्स येथे हा फेस्टिव्हल होणार होता. मात्र पर्यटन विभागाने हा फेस्टिव्हल रद्द केला.

पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले की, लईराई देवीच्या जत्रोत्सवात झालेल्या दुर्घटनेबाबत आम्ही चिंतीत आहोत. या कठीण काळात गोव्यातील (Goa) लोकांच्या सुरक्षिततेला, कल्याणाला आणि त्यांच्या भावनांना आम्ही प्राधान्य देतो. पीडित कुटुंबियांच्या प्रती आम्ही मनापासून संवदेना व्यक्त करतो. तसेच, जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्याची कामना करतो.

Spirit of Goa Festival

प्रशासन आणि देवस्‍थान समितीला दोष नका

या घटनेनंतर लईराई देवस्‍थानचे अध्‍यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, "झालेली घटना अत्‍यंत दुर्दैवी आहे. त्‍याचा आम्‍हाला खेद आहे. काही धोंडगण आणि भाविकांच्‍या बेजबाबदारपणामुळे हा दुःखद प्रसंग ओढवला, त्यामुळे प्रशासन आणि देवस्‍थान समितीला दोष देणे चुकीचे ठरेल. पुढे कौल- प्रसाद आहे. तेव्‍हा भाविकांनी गर्दी टाळावी. पाचव्‍या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही दक्षता बाळगावी."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT